आमचा संसारच उघड्यावर शौचालय बांधायचे कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:12 AM2017-09-15T00:12:18+5:302017-09-15T00:12:48+5:30

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेतून समृद्धीचा नारा देत गावोगावी शौचालय बांधण्याचा उपक्रम सुरू आहे.

Where to build toilet open in the world? | आमचा संसारच उघड्यावर शौचालय बांधायचे कुठे ?

आमचा संसारच उघड्यावर शौचालय बांधायचे कुठे ?

Next
ठळक मुद्देभटक्यांची समस्या : स्वच्छ भारत मिशन अभियानाला तडा

अखिलेश अग्रवाल।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेतून समृद्धीचा नारा देत गावोगावी शौचालय बांधण्याचा उपक्रम सुरू आहे. हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी शासन शौचालय बांधण्यास अनुदानही देते. मात्र, गावकुसाबाहेर पाल ठोकून उघड्यावर संसार करणाºया भटक्यांपुढे मोठा प्रश्न पडला आहे. घरासाठी जागा नाही तेथे शौचालय बांधायचे कुठे, असा प्रश्न आहे. पुसद शहरासह इतर ठिकाणीही भटक्यांची अशी परिस्थिती प्रशासनाच्या मोहीमेला अडसर ठरत आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातून आलेले अनेक कुटुंब मिळेल त्या ठिकाणी पाल उभे करतात. तेथेच त्यांचा संसार सुरू होते. दिवसभर फिरू पत्र्याचे डब्बे, खुर्च्या, खाटा विकून संसाराचा गाडा ओढळतात. दिवसाकाठी २०० रुपयेही त्यांच्या हाती उरत नाही. अशा परिस्थिती ही मंडळी पक्के घर बांधण्याचे स्वप्नही पाहू शकत नाही. जेथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तेथे शौचालय बांधायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो.
पुसद शहारासह तालुक्यात ठिकठिकाणी पारधी बेडे आहेत. या बेड्यावर राहणारी मंडळी उघड्यावर राहतात. त्यांनाही आता शौचालय बांधण्याची सक्ती होऊ लागली. परंतु उघड्या आकाशाखाली राहणाºया मंडळींना बंदिस्त शौचालय मानवेल काय, असा प्रश्न आहे.
एकीकडे अनुदान घेऊन शौचालय बांधणारे अनेक कुटुंबही गावात शौचालयाचा वापर करीत नाही. आजही राजरोजपणे लोटा घेऊन मोकळ््या जागेचा शोध घेतातत. अशा व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारायचा सोडून भटक्यांवरच कारवाई होत आहे. ज्यांना घरच नाही, त्यांना उघड्यावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येते.
कारवाईपूर्वी समज द्या
पुसद शहरासह तालुक्यात उघड्यावर शौचास बसणाºयांवर कारवाई केली जात आहे. गुड मॉर्निंग पथक पहाटेच धडक देत आहे. या कारवाईच्या कचाट्यात अनेक भटके सापडतात. परंतु अशा मंडळींची चौकशी करूनच कारवाई करावी, अशी मागणी आहे. परंतु पाठ थोपटून घेण्यासाठी हे पथक उघड्यावर जाणाºयांची वरात काढून पोलीस ठाण्यात आणतात, त्यांच्यावर गुन्हेही दाखल करतात. परंतु त्यांच्या परिस्थितीचा विचार करीत नाही.

Web Title: Where to build toilet open in the world?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.