जेथे सातबारा तेथे विहीर द्या

By admin | Published: March 4, 2015 01:43 AM2015-03-04T01:43:56+5:302015-03-04T01:43:56+5:30

सिंचनाची सोय नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत, ते रोखण्यासाठी

Where seven boats give it well | जेथे सातबारा तेथे विहीर द्या

जेथे सातबारा तेथे विहीर द्या

Next

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे साकडे : पिंपरी येथे मुक्कामी सभा
सिंचनाची सोय नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत, ते रोखण्यासाठी शासनाने सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्या, जेथे सातबारा तेथे विहीर हे सूत्र सरकारने लागू करावे, अशा शब्दात पिंपरी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंना साकडे घातले.
मुख्यमंत्री यवतमाळ येथील विभागीय आढावा बैठक आणि रातचांदणा व घोडखिंडी या गावांच्या भेटी आटोपून रात्री १० वाजता यवतमाळ-अकोलाबाजार रोडवरील पिंपरी बु. गावात मुक्कामासाठी पोहोचले. येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्याची संपूर्ण मुभा दिली गेली होती. शेतकरी म्हणाले, खासदार-आमदारांना पेंशन मिळते, मोलकरणीलाही १० हजार रुपये पेंशन दिले जाते, मग शेतकऱ्यांवरच शासनाचा अन्याय का ?, शेतकऱ्यांनाही शासनाने पेंशन लागू करावे. शेततळे आणि बंधारे बांधून शेतकऱ्यांंना कोणताही फायदा होत नाही, त्याऐवजी प्रत्येक शेतात विहीर देऊन सिंचनासाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, किमान दिवसातरी पूर्णवेळ वीज कृषिपंपाला मिळावी अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतमालाला खर्चावर आधारित हमी भाव, सोयाबीन, कापूस यावर प्रक्रिया उद्योग, दीर्घ मुदती बिनव्याजी कर्ज आदी मागण्या यावेळी ठेवण्यात आल्या.
सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या पिंपरी गावात मुख्यमंत्र्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल दहा घरी ही व्यवस्था केली गेली. यातील नेमक्या कोणत्या घरी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम राहील, हे स्पष्ट नव्हते. या सर्वच घरी मुख्यमंत्र्यांसाठी साध्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यमंत्री ज्या घरी मुक्काम करेल, अगदी त्याच्या बाजूच्या घरी जिल्हाधिकाऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली गेली होती. पिंपरी हे गाव नियमित भारनियमनाचा सामना करते मात्र आज वीज पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी वीज वितरण कंपनीने घेतल्याचे दिसून आले. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. या गावातील रस्त्यांची स्थिती चांगली आहे. गावाचे पोलीस पाटील पद काही महिन्यांपासून रिक्त आहे. शेजारील हदगावच्या पोलीस पाटलाकडे पिंपरीचा अतिरिक्त प्रभार आहे.
प्राथमिक शाळेच्या पटांगणात मुख्यमंत्र्यांसाठी भारतीय बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे बसूनच त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन तत्काळ त्या सोडविण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री मुक्काम करणार असल्याने पिंपरी गावात रात्रीलाही शासकीय अधिकाऱ्यांची उशिरापर्यंत मोठी गर्दी होती. मुख्यमंत्री मुक्कामी येणार असल्याने दोन दिवसांपासून गावात शासकीय यंत्रणेची तयारी सुरू होती. मंगळवारी रात्री तर यात्रा आहे की काय, असे चित्र पहायला मिळाले. एरव्ही साधा कर्मचारी भेटत नाही आज मात्र मंत्रालयातील सचिव दिसले.

Web Title: Where seven boats give it well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.