पांढºया सोन्याची गुलाबी अळीने केली माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 10:04 PM2017-11-09T22:04:03+5:302017-11-09T22:04:20+5:30
महागाव तालुक्यातील मुडाणा परिसरात गुलाबी बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले असून आता शेतकरी पºहाटीवर नांगर फिरवित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुडाणा : महागाव तालुक्यातील मुडाणा परिसरात गुलाबी बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले असून आता शेतकरी पºहाटीवर नांगर फिरवित आहे. मुडाणा येथील अशोक येनकर या शेतकºयाने डोळ्यात अश्रू आणत मंगळवारी आपल्या शेतातील पºहाटीवर नांगर फिरविला.
मुडाणा येथील बहुतांश शेतकºयांच्या पºहाटीवर गुलाबी बोंडअळीने आक्रगण केले आहे. आता उत्पन्नाची आशा नाही. त्यामुळे शेतकरी पºहाटीत नांगर टाकत आहे. अशोक येनकर हे शेतकरी मंगळवारी आपल्या शेतातील पºहाटी उपटत होते. त्यावेळी आमदार राजेंद्र नजरधने पथकासह या शेतात पोहोचले. त्यांनी शेतकºयाला विचारले असता शेतकºयाने विदारक स्थिती मांडली. आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचे शेतकरी येनकर यांनी सांगितले. तसेच नुकसान भरपाईसाठी उपाययोजना करण्याचे मागणी केली. यावेळी कृषी अधिकारी प्रशांत नाईक, आर.डी. येनकर यांच्यासह शेतकरी गजानन पाटील, संदीप खराटे, पोलीस पाटील दिलीप खराटे, नंदू येनकर, साधू येनकर, गजानन भिमटे, गंगाप्रसाद खंदारे, दुलाजी भिमटे, सदानंद पाटील, बंडू पाटील, अवधूत काळे, आबासाहेब येनकर उपस्थित होते.