कामगारांच्या नावावर कोण जेवले फुकटात? आता १ जुलैपासून केवळ नोंदणीकृत कामगारांनाच पैसे घेऊन लाभ

By अविनाश साबापुरे | Published: June 29, 2023 06:26 PM2023-06-29T18:26:11+5:302023-06-29T18:26:24+5:30

बांधकाम कामगारांना रोजमजुरीसोबतच मोफत जेवण देण्याचीही योजना गेल्या वर्षभरापासून राज्यात सुरू आहे.

Who eats free in the name of workers Now from July 1, only registered workers can get benefits with money | कामगारांच्या नावावर कोण जेवले फुकटात? आता १ जुलैपासून केवळ नोंदणीकृत कामगारांनाच पैसे घेऊन लाभ

कामगारांच्या नावावर कोण जेवले फुकटात? आता १ जुलैपासून केवळ नोंदणीकृत कामगारांनाच पैसे घेऊन लाभ

googlenewsNext

यवतमाळ: बांधकाम कामगारांना रोजमजुरीसोबतच मोफत जेवण देण्याचीही योजना गेल्या वर्षभरापासून राज्यात सुरू आहे. यात नोंदणीकृत कामगारांसोबतच अनोंदणीकृत कामगारांनाही लाभ मिळत होता. वर्षभरात तब्बल ३१ कोटी ७४ लाखांपेक्षा अधिक मोफत थाळ्या वाटप झाल्याची आकडेवारी माहिती अधिकारातून पुढे आली. ही परिस्थिती पाहता आता या योजनेत बदल होणार आहे. १ जुलैपासून केवळ नोंदणीकृत कामगारांनाच जेवण दिले जाणार असून त्यांच्याकडूनही पाच रुपयांचे शुल्क घेतले जाणार आहे. 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना मध्यान्ह भोजन वितरित करण्याची योजना राबविली जात आहे. परंतु, अनेक ठिकाणी यात कामगारांच्या नावावर भलतेच लोक जेवण करीत असल्याच्या तक्रारी आहेत. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कामगारांसोबत नोंदणी नसलेल्या कामगारांनाही लाभ मिळत असल्याने कामगार म्हणून कोणीही लाभ घेऊ शकत आहे. याबाबत मंडळाच्या सचिवांनी शासनाशी पत्रव्यवहार करून योजनेत काही बदल प्रस्तावित केले होते. त्याला शासनाने आता हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यानुसार आता केवळ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या व सक्रिय (जीवित) असलेल्या कामगारांनाच मध्यान्ह भोजन वितरित करण्याचे निर्देश राज्याच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने २६ जून रोजी मंडळाच्या सचिवांना दिले आहेत. या जेवणासाठी मंडळाने कामगार हिश्शाची ५ रुपयांची रक्कमही वसूल करण्याचे निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत. 

आरएफ बेस्ड कार्डचा होणार वापर 
कामगारांच्या मध्यान्ह भोजन योजनेतील या बदलांचा अवलंब १ जुलैपासून होणार आहे. आता भोजन वितरित करताना आरएफ बेस्ड कार्डचा (भोजन वितरण प्रणाली कार्ड) वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे नोंदणीकृत कामगारांशिवाय अन्य कोणीही या भोजनावर ताव मारू शकणार नाही, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते विशाल ठाकरे यांनी दिली. मात्र गेल्या वर्षभरात कामगार नसलेल्या कोणी-कोणी हा लाभ लाटला, याचा शोध घेण्याची गरज आहे.

वर्षभरात मोफत वाटप झालेल्या थाळ्यांचा तपशील

  • मुंबई शहर : १०६८७४९०
  • मुंबई पश्चिम : ५६२०७८२
  • मुंबई पूर्व : ५१२९०५४
  • नवी मुंबई : १४९६२३८
  • ठाणे : ५३३०००४
  • कल्याण : २४२९००७
  • रायगड : ४८२५४३६
  • पालघर : ८५३४८०
  • पुणे : २१०८७५१९
  • सोलापूर : २१३१०६०१
  • बार्शी : १८८५६५४
  • कोल्हापूर : २१५५६०५३
  • सांगली : ४४६३७२७
  • सातारा : ३२८२६९४
  • इचलकरंजी : १८१८९०४३
  • संभाजीनगर : १००८२१३४
  • लातूर : ९९१२०११
  • बीड : ६५४२१८०
  • जालना : १९९६२९२५
  • परभणी : ५७७५७७२
  • हिंगोली : ७५३२४९३
  • नांदेड : ३२७५७८८
  • धाराशिव : ७५२७११०
  • नागपूर : २६१६८६८२
  • वर्धा : २५०५५२३
  • भंडारा : ४८६८२०४
  • गडचिरोली : ५०२८३१०
  • चंद्रपूर : ३५२९५०४२
  • अकोला : ६३१३७९७
  • अमरावती : ७९६६२८२
  • वाशिम : १३११४५२
  • यवतमाळ : ३१८२११५
  • बुलडाणा : १६९२९०२०
  • नाशिक : ६३२०७३७
  • अहमदनगर : २७५३७४५
  • एकूण : ३१,७४,००,१०४ 

Web Title: Who eats free in the name of workers Now from July 1, only registered workers can get benefits with money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.