पत्नीचा विळ्याने गळा चिरुन खून

By admin | Published: September 19, 2016 01:07 AM2016-09-19T01:07:31+5:302016-09-19T01:07:31+5:30

चारित्र्यावर संशय घेत दारूड्या पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना महागाव

The wife wandered and threw her blood | पत्नीचा विळ्याने गळा चिरुन खून

पत्नीचा विळ्याने गळा चिरुन खून

Next

चिल्लीची घटना : चारित्र्यावर संशय, पतीस अटक, प्रेतासह गावकरी ठाण्यावर
महागाव/फुलसावंगी : चारित्र्यावर संशय घेत दारूड्या पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान वंदनाच्या प्रेतासह गावकऱ्यांनी ठाण्यावर धडक देऊन आपला रोष व्यक्त केला.
वंदना कैलास चव्हाण (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तर कैलास प्रल्हाद चव्हाण (३५) असे आरोपीचे नाव आहे. चिल्ली इजारा येथील चव्हाण दाम्पत्य दोन वर्षांपासून रोजगारानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते. कैलास दारूच्या नशेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पुणे येथे त्रास असह्य झाल्याने वंदना दोन मुलासह चिल्ली येथे चार दिवसापूर्वी आली होती. तिच्या पाठोपाठ पतीही चिल्ली येथे आला. गत चार दिवसांपासून तो पत्नीला बेदम मारहाण करीत होता. मारहाणीच्या भीतीने वंदना तिच्या भावाकडे मुलांसह झोपण्यास गेली होती. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास पतीने पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने घराचा दरवाजा वाजविला. वंदनाने दरवाजा उघडताच कैलासने हातातील विळ्याने तिच्या मानेवर वार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. त्यावेळी तिच्या छातीवरही विळ्याने वार करण्यात आले. वार वर्मी लागल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना येथे रवाना केला. तसेच पती कैलासला जेरबंद केले. पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांपुढे दिली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या मागे आदर्श (१२) आणि यश (१०) वर्ष ही दोन मुले आहेत.
वंदनाचा खून झाल्याने गावकरी संतप्त झाले होते. तिचे प्रेत सवना येथून घेऊन गावकरी महागाव पोलीस ठाण्यावर धडकले. पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यांनी ठाण्याचे गेट बंद केले होते. बराच वेळ पोलीस ठाण्यापुढे थांबून गावकऱ्यांनी रोष व्यक्त करून मृतदेह चिल्ली येथे आणला. (लोकमत चमू)

Web Title: The wife wandered and threw her blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.