महागावच्या जंगलात रानटी कुत्र्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:28 PM2018-04-03T22:28:35+5:302018-04-03T22:28:35+5:30

महागाव तालुक्यातील जंगलांमध्ये रानकुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार करीत आहे. यात वासरांचा सर्वाधिक समावेश आहे.

Wild dogs of Mahagaon forest | महागावच्या जंगलात रानटी कुत्र्यांचा धुमाकूळ

महागावच्या जंगलात रानटी कुत्र्यांचा धुमाकूळ

googlenewsNext
ठळक मुद्देजनावरांची शिकार : बंदोबस्तासाठी वन विभागाकडे मागणी

नरेंद्र नप्ते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुडाणा : महागाव तालुक्यातील जंगलांमध्ये रानकुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार करीत आहे. यात वासरांचा सर्वाधिक समावेश आहे. या प्रकाराने शेतकरी धास्तावले असून या रानकुत्र्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा, अशी मागणी होत आहे.
महागाव तालुक्यात घनदाट जंगल आहे. तसेच लगतच्या उमरखेड तालुक्यात पैनगंगा अभयारण्य आहे. हिंस्र प्राण्यासोबत आता रानकुत्र्यांचीही संख्या वाढली आहे. या रानकुत्र्यांनी आता जनावरांवर हल्ला करणे सुरू केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे शेतात ठेवली आहे. त्या ठिकाणी गोठे बांधले आहेत. आता याच गोठ्यातील जनावरांना रानकुत्र्यांनी टार्गेट केले आहे. पाच ते सहाच्या झुंडीने राहणारे रानकुत्रे वासरांवर अचानक हल्ला करतात. त्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावले की, शेतकºयांवरही चवताळून धावून येतात. यामुळे शेतकºयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुडाणा परिसरात आतापर्यंत या कुत्र्यांनी २० जनावरांची शिकार केली आहे. या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
संतोष जाधव, सदानंद मुधोळ, गजानन उंचेगावकर, दिलीप खराटे, संतोष खराटे, रमेश येनकर, गणेश शिंदे, मार्लेगावकर, बंडू येनकर, सुभाष जाधव, बबन किवले, वसंतराव गावंडे आदी शेतकºयांच्या जनावरांचा या कुत्र्यांनी बळी घेतला आहे.
-तर मनुष्यावरही हल्ले होतील
झुंडीने राहणारे रानकुत्रे एकदम आक्रमक असतात. या कुत्र्यांंना शिकार मिळाली नाही तर आणखी आक्रमक होऊ शकतात. वन विभागाने या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त केला नाही तर मनुष्यावरही हल्ले करण्यास रानकुत्रे मागे पुढे पाहणार नाही.

Web Title: Wild dogs of Mahagaon forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.