जिद्द आणि परिश्रम हाच यशाचा मार्ग
By admin | Published: January 2, 2016 08:36 AM2016-01-02T08:36:59+5:302016-01-02T08:36:59+5:30
प्रत्येकाने ध्येय निश्चित केल्यानंतर जिद्द आणि चिकाटी बाळगली पाहिजे. जिद्द आणि परिश्रम हाच यशाचा मार्ग आहे,
यवतमाळ : प्रत्येकाने ध्येय निश्चित केल्यानंतर जिद्द आणि चिकाटी बाळगली पाहिजे. जिद्द आणि परिश्रम हाच यशाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
नागभूमी वडगाव येथे भारतीय संविधान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. डॉ.बाबासाहेब बहुद्देशीय संस्था, दि बुद्धिस्ट पेन्शनर्स सोशल असोसिएशन, भारतीय बौद्ध महासभा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, महाराष्ट्र आॅफिसर फोरम, समता सैनिक दल, प्रज्ञावंत बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला जिल्हाभरातून विद्यार्थी बसले होते. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी अॅड. सोपान कांबळे होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, प्रकल्प संचालक विनय ठमके यांनीही मनोगत व्यक्त केले. परीक्षेसाठी १४०० प्रवेशिका आल्या होत्या. तर ८७० स्पर्धक प्रत्यक्ष उपस्थित होते. एस.व्ही. फुलझेले, अॅड. गोविंद बनसोड, रवींद्र टेंभुर्णे, नामदेव थूल, व्ही.के. भगत, धम्मा कांबळे यांच्या नियंत्रणात परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे. परीक्षेच्या आयोजनासाठी के.एस. नाईक, टी.एन. मेश्राम, रामराव कांबळे, प्रा.सागर जाधव, प्रा.अशोक कांबळे, प्रा.भीमराव ठोंबरे, प्रा.अशोक गाणार, प्रा.अरुण कांबळे, प्रा.चंद्रकांत सरदार, योगानंद टेंभुर्णे, बी.जी. पाटील, मनोहर नगराळे आदींनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)