दोषारोपपत्राशिवाय गुन्ह्याला कोर्ट केस म्हणता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 02:27 PM2019-03-11T14:27:24+5:302019-03-11T14:29:32+5:30

दोषारोपपत्र न्यायालयात सादर होत नाही तोपर्यंत गुन्हा अथवा कोर्ट केस दाखल आहे, असे म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी एका तहसीलदाराच्या राजकीय सोईने झालेल्या बदलीप्रकरणात दिला आहे.

Without a blasphemy, crime can not be called a court case | दोषारोपपत्राशिवाय गुन्ह्याला कोर्ट केस म्हणता येणार नाही

दोषारोपपत्राशिवाय गुन्ह्याला कोर्ट केस म्हणता येणार नाही

Next
ठळक मुद्दे‘मॅट’चा निर्वाळादाखल गुन्ह्याचा सोयीने अर्थ लावल्याचे उघड बदलीला स्थगनादेश

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोषारोपपत्र न्यायालयात सादर होत नाही तोपर्यंत गुन्हा अथवा कोर्ट केस दाखल आहे, असे म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी एका तहसीलदाराच्या राजकीय सोईने झालेल्या बदलीप्रकरणात दिला आहे. या तहसीलदाराच्या बदलीला स्थगनादेशही देण्यात आला.
नाशिक येथील तहसीलदार (निवडणूक) गणेश उत्तम राठोड यांची धुळ्याला जिल्हाधिकाऱ्यांचे पीए म्हणून २० फेब्रुवारीला बदली करण्यात आली. ते कार्यमुक्तही झाले. मात्र त्यानंतर २५ फेब्रुवारीला बदलीचा आदेश फिरवून त्यांना अहमदनगर येथे तहसीलदार (सामान्य प्रशासन) म्हणून नियुक्ती देण्यात आली. त्यांच्या धुळ्यातील जागेवर अभय महाजन यांना मालेगाववरून (नाशिक) आणण्यात आले. दरम्यानच्या काळात पतीची बदली झाल्याने उपजिल्हाधिकारी असलेल्या त्यांच्या पत्नीचीही धुळे येथे विनंतीवरून बदली करण्यात आली होती. गणेश राठोड यांचा हा बदली आदेश फिरविण्यामागे त्यांच्याविरुद्ध दाखल कोर्ट केस-गुन्हा ही सबब पुढे केली गेली. अखेर राठोड यांनी या बदलीला अ‍ॅड.अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये आव्हान दिले.
गणेश राठोड यांचे हे प्रकरण २०१५ चे आहे. २०१७ ला मिळकत पत्रिकेचे शासकीय काम करताना दुखावलेल्या एका व्यक्तीने २०१७ मध्ये त्यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फौजदारी प्रकरण दाखल केले. सप्टेंबर २०१८ ला न्यायालयाने त्यावर नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिला. मात्र पोलिसांनी तपास सुरू आहे एवढेच उत्तर त्यात दिले. आजतागायत दोषारोपपत्र दाखल केले नाही. परंतु याच प्रकरणाचा आधार घेत व निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याचे सांगत सरसकट राठोड यांचा बदली आदेश फिरविला गेला. वास्तविक गुन्ह्याचा निवडणुकीशी संबंध आहे का, याचे वर्गीकरण अथवा चिंतन केले गेले नाही. या प्रकरणात न्या.कुºहेकर यांनी रेकॉर्डची तपासणी केली. त्यावर चार्जशिट नसताना फौजदारी केस दाखल झाली असे समजू नये, असा निर्वाळा देत राठोड यांच्या नगरमधील बदलीला स्थगनादेश दिला व त्यांची धुळे जिल्हाधिकाऱ्यांचे पीए म्हणून झालेली बदली कायम केली. तेथे रुजू झालेल्या अभय महाजन यांना चार्ज सोडण्यास सांगितले. या प्रकरणात शासनाच्यावतीने मुख्य सादरकर्ता अधिकारी स्वाती मंचेकर यांनी काम पाहिले. राठोड यांच्यावतीने अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर, अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.

चार जिल्ह्यांचे मास्टर ट्रेनर
गणेश राठोड यांना नाशिकमध्ये चार जिल्ह्यांचे मास्टर ट्रेनर व एका जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र नंतर त्याच राठोड यांना बदलविले गेले.

Web Title: Without a blasphemy, crime can not be called a court case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.