‘भावसरगम’ने वणीकर रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 09:50 PM2017-09-28T21:50:03+5:302017-09-28T21:50:15+5:30

प्रख्यात संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर तथा त्यांच्या कन्या राधा मंगेशकर यांच्याद्वारे गत ५० वर्षांपासून जगभर पसरलेल्या मराठी श्रेत्यांच्या मनावर अविट छाप ठेऊन असलेल्या ‘भावसरगम’ या कार्यक्रमाने वणीकर श्रोते मंत्रमुग्ध झालेत.

Wizky rosy mesmerizing with 'Bhavsargam' | ‘भावसरगम’ने वणीकर रसिक मंत्रमुग्ध

‘भावसरगम’ने वणीकर रसिक मंत्रमुग्ध

Next
ठळक मुद्देजैताई नवरात्रोत्सव: हृदयनाथ मंगशेकर, राधा मंगेशकरांचे गायन

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : प्रख्यात संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर तथा त्यांच्या कन्या राधा मंगेशकर यांच्याद्वारे गत ५० वर्षांपासून जगभर पसरलेल्या मराठी श्रेत्यांच्या मनावर अविट छाप ठेऊन असलेल्या ‘भावसरगम’ या कार्यक्रमाने वणीकर श्रोते मंत्रमुग्ध झालेत. मंगळवारी येथील जैताई नवरात्रोत्सवात हा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
माऊली ज्ञानेश्वर महाराजांची आत्मानंद अनुभूती व्यक्त करणाºया ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’ या नितांत रमणीय सांगीतीक प्रवासाचा आरंभ झाला आणि त्या गायन ओघातच पंडितांनी संत चोखामेळांचे ‘ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा’ ही रचनाही याच समान वजनात कशी आहे, हे दाखवत ज्ञानोबा ते चोखोबा एकवाक्यता अधोरेखित केली. प्रारंभालाच सादर झालेल्या या अविट गोडीच्या रचनांचा आस्वाद रसिकांनी घेतला.
त्या पाठोपाठ राधा मंगेशकर यांनी ‘केव्हा तरी पहाटे’, हृदयनाथांच्या संगीतकार प्रवासातील मैलाचा दगड असणाºया जैत रे जैतचे ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ गाणी सादर केली. राम शेवाळकरांची वारंवार आठवण काढणाºया पंडितजींनी ह्यांना आदरांजली रूपात माऊलींची ‘असा येता परिमळू’ रचना सादर केले. मैफलीच्या शेवटी आशुतोष शेवाळकरांच्या विशेष आग्रहावरून राधा मंगेशकर यांनी ‘उजाडल्यावरी सख्या’ ही रचना सादर केली आणि पसायदान होत ही स्वरगंगा थांबली.

Web Title: Wizky rosy mesmerizing with 'Bhavsargam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.