विहीर अधिग्रहणाच्या पैशासाठी वृद्धेची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:25 PM2018-04-20T23:25:38+5:302018-04-20T23:27:48+5:30

तालुक्यातील उमरठा येथील एका महिला शेतकऱ्याची विहीर नेर पंचायत समितीने मागीलवर्षी अधिग्रहीत केली. बारमाही पिकांचे ओलित सोडून त्या माऊलीने ग्रामस्थांना पाणी पुरविले. मात्र आता त्याच माऊलीला विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळविण्यासाठी प्रशासनाच्या दारात भटकंती करावी लागत आहे.

 Wolf wander for money acquisition cost | विहीर अधिग्रहणाच्या पैशासाठी वृद्धेची भटकंती

विहीर अधिग्रहणाच्या पैशासाठी वृद्धेची भटकंती

Next
ठळक मुद्देद्वारकाबाईची व्यथा : पिकाला तिलांजली देऊन पाजले ग्रामस्थांना पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यातील उमरठा येथील एका महिला शेतकऱ्याची विहीर नेर पंचायत समितीने मागीलवर्षी अधिग्रहीत केली. बारमाही पिकांचे ओलित सोडून त्या माऊलीने ग्रामस्थांना पाणी पुरविले. मात्र आता त्याच माऊलीला विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळविण्यासाठी प्रशासनाच्या दारात भटकंती करावी लागत आहे.
तालुक्यातील परजना-उमरठा येथे पाणीटंचाई पाचविलाच पुजलेली आहे. त्यामुळे उमरठा येथील विधवा शेतकरी महिला व्दारकाबाई नथ्थूजी पाढेन यांच्या शेतातील विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. ग्रामपंचायत उमरठा, पंचायत समिती नेर व तहसीलदारांच्या संयुक्त मागणीवरून एप्रिल २०१७ मध्ये त्यांच्या शेतातील विहीर अधिग्रहीत करण्यात आली. त्यापोटी मोबदला देण्याचे ठरले. मागीलवर्षी याच विहिरीवरून परजना गावाला पाणीपुरवठा केला गेला. त्यांनी पिकाचे ओलित बाजूला सारून गावकºयांना पाणी पाजले. त्यांच्या नशीबी पाण्याच्या मोदबल्यासाठी भटकंतीची वेळ आली.
व्दारकाबार्इंना एप्रिल २०१७ ते ३० जून २०१७ या उन्हाळ्यातील तीन महिन्यांचा मोबदला मिळाला. मात्र परजना गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवीत असतानाही त्यांना मोबदला मिळाला नाही. यामुळे त्यांनी पाणी बंद करून पिकाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाणी पुरवठा प्रशासनाने त्यांच्या विहिरीवरील पाणीपुरवठा बंदच करू दिला नाही. परिणामी १ जुलै २०१७ पासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यत याच विहिरीवरून परजनाला पाणीपुरवठा झाला. त्यामुळे शेतात कोणत्याच पिकाचे ओलित करता आले नाही. या पाणीपुुरवठा मोबदल्यासाठी आता व्दारकाबाई ही विधवा शेतकरी महिला प्रशासनाचे उंबरठे झीजवीत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विहिरीवरून अद्यापही परजना गावाला पाणीपुरवठा सुरूच आहे.
पाढेन कुटुंबावर उपासमारीची वेळ
गावकºयांना पाणी पाजायचे असल्याने शेतातील उभ्या पिकाला पाणी देता आले नाही. त्यामुळे गेल्यावर्षी व्दारकाबाई यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यातून घरगाडा चालविणे कठीण झाले. प्रशासनाने पाण्याचाही मोबदला दिला नाही. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ग्रामस्थाांना पाणी देऊन मी कोणता गुन्हा केला, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. आता त्यांनी मूख्यमंत्री, पालकमंत्री, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह जिल्हाधिकाºयांकडे मोबदल्याची मागणी केली आहे.

Web Title:  Wolf wander for money acquisition cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.