मानवनिर्मित तलावात बुडून महिलेचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 02:11 PM2018-10-07T14:11:39+5:302018-10-07T14:12:18+5:30

राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील मानवनिर्मित तलावात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला.

The woman died due to drowning in a man-made pond | मानवनिर्मित तलावात बुडून महिलेचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली

मानवनिर्मित तलावात बुडून महिलेचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली

Next

यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील मानवनिर्मित तलावात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (7 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास  घडली.  कालिंदा पेंद्राम (वय ४० वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. घरातील कामे आटोपून कालिंदा आपली मुलगी छकुली (१५) सह धुणे धुण्यासाठी एका महाविद्यालयामागील मानवनिर्मित तलावावर गेल्या होत्या. काम करत असताना अचानक छकुलीचा तोल गेल्याने ती पाण्यात बुडाली. तिला वाचविण्यासाठी कालिंदाने पाण्यात उडी घेतली. तोपर्यंत मुलगी छकुलीने आरडाओरडा केल्याने परिसरात असलेल्या लक्ष्मण निमसटकर या तरुणाने घटनास्थळी धाव घेतली. त्याने पाण्यात उडी मारुन छकुलीला बाहेर काढले. तोपर्यंत कालिंदा पाण्यात बुडाली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला. 

वाढोणा बाजार येथे एका महाविद्यालयामागे कळंब-राळेगाव-वडकी सिमेंट रस्ता बांधणा-या बांधकाम कंपनीने मुरुमासाठी उत्खनन केले. या उत्खननामुळे तेथे तलाव सदृश मोठा खड्डा निर्माण झाला. यात पावसाचे पाणी साचल्याने त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. गावातील अनेक महिला याच तलावावर धुणे धुण्यासाठी जातात. त्यातूनच रविवारी ही घटना घडली. त्यामुळे रस्ता बांधकाम कंपनीविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेची नागरिकांनी वडकी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Web Title: The woman died due to drowning in a man-made pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.