बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर यवतमाळातील शिक्षिकेने मिळविली नोकरी; १३ वर्षांनंतर फुटले बिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 02:41 PM2023-02-16T14:41:02+5:302023-02-16T14:42:49+5:30

वाशिम पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हे

woman gets teacher job on bogus disability certificate in Yavatmal, revealed 13 years after a complaint by the dy sarpanch | बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर यवतमाळातील शिक्षिकेने मिळविली नोकरी; १३ वर्षांनंतर फुटले बिंग

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर यवतमाळातील शिक्षिकेने मिळविली नोकरी; १३ वर्षांनंतर फुटले बिंग

googlenewsNext

यवतमाळ : बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन यवतमाळातील शिक्षिका पांढरकवडा नगरपरिषदेत २००९ मध्ये रुजू झाली. ऑफलाइन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या शिक्षिकेने बनावट आधार कार्ड तयार करून वाशिम जिल्ह्याचा पत्ता टाकला. त्या आधारावर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातून खोटे दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले. एका तक्रारीने १३ वर्षांनंतर या शिक्षिकेचे बिंग फुटले. वाशिम पोलिसांनी शिक्षिकेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

सोनल प्रकाश गावंडे रा. मंगलमूर्ती नगर, वडगाव, यवतमाळ असे बोगस शिक्षिकेचे नाव आहे. तिने २००९ मध्ये दिव्यांगाचा लाभ घेण्यासाठी खोटे कागदपत्र तयार केले. यात तिला नगरपरिषद शिक्षण विभागातील कर्मचारी अतुल वानखडे रा. चापमनवाडी यवतमाळ, राजश्री शाहू महाराज प्राथमिक शाळा पांढरकवडा येथील शिक्षक नहूष ज्ञानेश्वर दरवेशवार रा. सत्यनारायण ले-आउट वडगाव यवतमाळ यांनी मदत केली. या आधारावर सोनल गावंडे नगरपरिषद शाळा पांढरकवडा येथे रुजू झाल्या. हा गंभीर प्रकार उपसरपंच मयूर सदानंद मेश्राम रा. हिवरा बु. ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती यांच्या तक्रारीनंतर उघड झाला. शिक्षण विभागाने मयूर मेश्राम यांच्या तक्रारीची दखल घेऊन फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये २ सप्टेंबर २०२२ रोजी सोनल गावंडे यांनी अपंग युडीआयडी ऑनलाइन अर्ज दाखल केला. त्यासोबत बोगस अपंग प्रमाणपत्र व बोगस आधार कार्ड तसेच वाशिम जिल्ह्यातील रहिवासी दाखले जोडले. रुग्णालयामार्फत या प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता सर्व कागदपत्रे खोटे आढळून आले. वाशिम जिल्हा रुग्णालयाने याची तत्काळ माहिती वाशिम शहर पोलिस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलिसांनी शिक्षिकेसह तिघांविरुद्ध कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.

फेरपडताळणीतून वास्तव बाहेर

शिक्षण विभागात बोगस अपंग प्रमाणपत्र जोडून बदलीमध्ये सवलत घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागात काही वर्षांपूर्वी हा प्रकार उघड झाला. आता तर चक्क बाहेर जिल्ह्यातील रहिवासी दाखवून अपंग प्रमाणपत्र काढण्यात आले. त्या आधारावर नगरपरिषद शाळेत कायमस्वरूपी नोकरी मिळविली. यावरून संगनमताने शासकीय नोकरीत येण्यासाठी मोठा गुन्हा होत असल्याचेही सिद्ध झाले आहे.

Web Title: woman gets teacher job on bogus disability certificate in Yavatmal, revealed 13 years after a complaint by the dy sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.