ऑटोरिक्षातून महिलेचे ८० हजारांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:41 PM2020-02-16T18:41:45+5:302020-02-16T18:44:18+5:30
अकोला येथून यवतमाळकडे येत असताना एकविरा चौकात एसटी बस बंद पडली.
यवतमाळ : अकोला येथून यवतमाळकडे येत असताना एकविरा चौकात एसटी बस बंद पडली. प्रवाशी महिलेने तेथेच उतरून ऑटोरिक्षा बोलावला. या दरम्यान त्या महिलेच्या पर्समध्ये असलेली ७८ ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने अज्ञात महिलेने लंपास केले. हा प्रकार शुक्रवारी ११.३० वाजता दरम्यान घडला.
सीमा गणेश गिरी रा.उरी अकोला असे प्रवासी महिलेचे नाव आहे. त्या वादाफळे मंगल कार्यालयात लग्नसोहळ्यात जाण्यासाठी यवतमाळला आल्या होत्या. दरम्यान त्यांची एसटी बस एकविरा चौकात बंद पडली. त्यांनी ऑटोत बसून दर्डा नाक्यापर्यंत प्रवास केला. या दरम्यान अज्ञात महिलेने त्यांच्या पार्समधून दागिने लंपास केले असावे, अशी तक्रार दिली आहे. त्या दागिन्यांची किमत ८० हजार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी लोहारा ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.