प्रसूतीस आलेल्या महिलेला डॉक्टरांनी मध्यरात्री हाकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 11:55 PM2019-08-11T23:55:06+5:302019-08-11T23:55:48+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी येणाºया सर्वसामान्य महिलांचे हाल सतत चर्चेत असतात. आता तर चक्क भाजपच्या एका पदाधिकाºयाच्या गर्भवती पत्नीला चक्क मध्यरात्री २ वाजता हाकलून लावण्याचा प्रताप डॉक्टरांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी येणाºया सर्वसामान्य महिलांचे हाल सतत चर्चेत असतात. आता तर चक्क भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या गर्भवती पत्नीला चक्क मध्यरात्री २ वाजता हाकलून लावण्याचा प्रताप डॉक्टरांनी केला आहे. विशेष म्हणजे या घटनेची पोलिसात तक्रार पोहोचल्यानंतर रुग्णालयीन गैरकारभाराची थेट पोलीस चौकशी सुरू झाली आहे.
हा गंभीर प्रकार ६ आॅगस्टच्या रात्री घडला. महागाव भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याने आपल्या प्रसव वेदनेने तडफडणाºया पत्नीला मंगळवारी रात्री १० वाजता मेडिकलच्या प्रसूती वॉर्डात आणले होते. येथे तिसºया मजल्यावर चढताना साधे स्ट्रेचरही उपलब्ध नव्हते. या युवा पदाधिकाऱ्यानेच शोधाशोध करून कशीतरी व्हीलचेअर मिळविली. वॉर्डात पोहोचल्यानंतर तिथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांकडून टोलवाटोलवी सुरू होती. तडफणाऱ्या महिलेला येथे कशाला आणले, खासगीत जायचे होते, अशा शब्दात सुनावले. प्रसवकळा सुरू असतानाही एक महिना प्रसूतीला अवकाश असल्याचे सांगितले. रात्री वेदना वाढल्यानंतरही डॉक्टर प्रतिसाद देत नव्हते.
अखेर रात्री २ वाजता तडफडणाºया पत्नीला घेऊन त्या भाजपा युवा पदाधिकाºयाने खासगी रुग्णालयात धाव घेतली. सरकारीत प्रसूतीला एक महिना अवकाश असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खासगी रुग्णालयात बुधवारी दुपारी प्रसूती झाली. अपमानास्पद वागणूक व जीविताला धोका निर्माण होईल, असे कृत्य सरकारी डॉक्टरांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून शहर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी रात्री कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना पोलिसांनी नोटीसही दिली आहे. या घटनेवरुन गरीब महिलांना काय वागणूक मिळत असेल याची कल्पना येते.
खुद्द जिल्हा कारागृह अधीक्षकांची तक्रार
या प्रकरणात खुद्द जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्तीचिंतामणी यांनी तक्रार दिली आहे. शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी तक्रार अर्जाची चौकशी सुरू केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर यांच्याकडे तपास देण्यात आला. मंगळवारी रात्री १० वाजता कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांची ओळख पटवून पुढील कारवाई केली जाणार आहे.