महिला संघटना झाल्या आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 06:00 AM2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:13+5:30
हिंगणघाट येथे प्राध्यापक युवतीला पेट्रोल टाकून पेटविण्यात आले. या घटनेचे संतप्त पडसाद बुधवारी यवतमाळात उमटले. विविध संघटनांनी एकत्र येत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपीला पेटवा, अशा संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गातून यावेळी उमटल्या. येथील बसस्थानक चौकातील शिवतीर्थावर विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. यावेळी आंदोलकांनी हिंगणघाट येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हिंगणघाट येथे प्राध्यापक युवतीला पेट्रोल टाकून पेटविण्यात आले. या घटनेचे संतप्त पडसाद बुधवारी यवतमाळात उमटले. विविध संघटनांनी एकत्र येत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपीला पेटवा, अशा संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गातून यावेळी उमटल्या.
येथील बसस्थानक चौकातील शिवतीर्थावर विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. यावेळी आंदोलकांनी हिंगणघाट येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. भविष्यात अशा घटनाच घडू नये यासाठी केंद्र शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करावे, अशी मागणी करण्यात आली. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोेर्टापुढे ठेवण्यात यावे, अशी मागणी यावेळी महिला संघटनांनी केली.
यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नारी रक्षा समिती, पीस आॅफ इंडिया, जिजाऊ ब्रिगेड, जिजाऊ बहुद्देशीय संस्था, कलाकुंज बहुद्देशीय महिला प्रशिक्षण संस्था, अखिल भारतीय महिला संविधानिक हक्क परिषद, यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, सह्यांद्री यूथ फाउंडेशन, सिहसंना द लॉयन आर्मी, यवतमाळ जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, रणरागिनी संघटना, अस्तित्व फाउंडेशन, निमा संघटना, संकल्प फाउंडेशन, वनिता वाहिनी अशा विविध संघटनाचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते.
आंदोलनात सरोज देशमुख, अवंती चौधरी, मनीषा तिरनकर, अंजली फेंडर, मीरा फडणीस, मधुरा वेळूकर, काजल कांबळे, पुष्पा जाधव, शितल तेलंगे, उज्वला झाडे, मंदा मडावी, दुर्गा पटले, रेखा पलटनकर, विजया वादाफळे, पूजा मुनगिनवार, अवंती सातपुते, पुजा दोंदल, विनोद दोंदल, सुशांत वंजारी, रोहन आदेवार, निरज डफळे, विनोद संगीतराव, विजय विसपुते, जितेंद्र सातपुते, योगिराज अरसोड, अनिल चिंचोळकर, संजय पवार, प्रवीण शेटे, विनोद भोसले आदी सहभागी झाले होते.
काँग्रेसने नोंदविला निषेध
हिंगणघाट येथील घटनेचा जिल्हा काँग्रेसने निषेध नोंदविला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक चंद्रशेखर चौधरी, नगरसेवक विशाल पावडे, नगरसेविका पल्लवी रामटेके, विक्की राऊत, अजय किनकर, शब्बीर खान, लाला तेलगोटे, राहूल वानखडे, ललित जैन, निशांत नैताम, रोहित देशमुख, मोहसीन खान, शकील पटेल, अॅड.संजय जैन आदी उपस्थित होते.
जनहित माझे गाव संघटना
हिंगणघाट येथे प्राध्यापक युवतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा ‘जनहित माझे गाव’ संघटनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला. संघटनेच्या लोहारा येथील कार्यालयात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी जनहित माझे गाव संघटनेचे अध्यक्ष विलास झेंडेकर, पद्माकर घायवान आदींसह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.