ओबीसींच्या मागण्यांसाठी महिलांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:48 AM2021-09-23T04:48:35+5:302021-09-23T04:48:35+5:30
यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी सावन कुमार यांना निवेदन देण्यात आले. केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, एमबीबीएस, एमएस मेडिकल ...
यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी सावन कुमार यांना निवेदन देण्यात आले. केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, एमबीबीएस, एमएस मेडिकल शिक्षणाच्या पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी ऑल इंडिया कोटांतर्गत ओबीसी संवर्गाला २७ टक्के आरक्षण लागू करावे, क्रिमीलेअरची घटनाबाह्य अट रद्द करावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
याशिवाय तालुका व जिल्हा स्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची व्यवस्था करावी व इतर मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. एसडीओ सावन कुमार यांनी ओबीसींच्या निवेदन शासनाला पाठवण्यात येईल, असे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष वर्षा पाटील, शहराध्यक्ष सीमा गिऱ्हे, संजीवनी कडस्कर, अनिता हिरवे, डॉ.सुलभा गुंबळे, निशा अजमिरे, संध्या महल्ले, संध्या त्रंकटवार, इंदुताई गवळी, ताईबाई गिरगावकर, सुनीता जाधव, सुरेखा मोगरे, हर्षलता गिऱ्हे, शारदा जिरोणकर, रेणुका जिरोणकर, अर्चना गवळी आदी उपस्थित होत्या.