दारुबंदीसाठी गोधनीतील महिलांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:06 AM2018-01-09T00:06:36+5:302018-01-09T00:06:59+5:30
गोधनी गावात अवैधरीत्या गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : गोधनी गावात अवैधरीत्या गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन गावातील दारूविक्री बंद करण्याची मागणी केली.
यवतमाळपासून अगदी जवळच असलेल्या गोधनी गावात तब्बल १० जण अवैधरीत्या गावठी दारू काढत आहेत. या दारूमुळे गावातील समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. व्यसनाधीनतेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शिवाय, सर्वाधिक त्रास घरातील महिलांना सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून गोधनीतील महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावरही धडक देण्यात आली. गोधनी गावातील दारू विक्री बंद न झाल्यास सर्व गावकरी उपोषणाला बसतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी गोधनीचे सरपंच सुभाष तोडसाम, पोलीस पाटील मंगेश मानकर, तंटामुक्ती अध्यक्ष मितेंद्र तिवारी, धनंजय वाघमारे, संजय गेडाम, देवीदास मसराम, परशराम आडे, रमेश गिरसाम, वर्षा खोब्रागडे, रंजना नेवारे, गिरजा आडे, पलव्वी भगत, येणूबाई भगत, सुनिता ससाने, लता पेंदाम, सुलोचना पेदराम, सुनिता ठाकरे, लक्ष्मी ससाने, मैनाबाई मलाजे, प्रियंका नगराळे, नानीबाई मुरापे, द्वारकाबाई भगत, कमला नेवारे, अनिता तोडसाम, सुनंदा ससाने, अरुणा मेश्राम, वंदना ससाने, सयू मारेकर, विद्या कानंदे, लिलाबाई खोब्रागडे, इंदू कुयेकार, सायत्रा वणकर, वेलूबाई तोंडरे, अनुसया रामगडे, अंजना भोयर, जमुना भोयर, गिरजा मुरापे, सुशिला कुभेकार आदी उपस्थित होते.