दारूबंदीसाठी महिलांची ठाण्यावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 09:36 PM2018-11-24T21:36:14+5:302018-11-24T21:36:54+5:30

तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विकली जात आहे. गावा-गावातून दारुचा महापूर वाहतो आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या आर्शिवादानेच हा सर्र्वप्रकार सुरु असल्याचा आरोप स्वामीनी दारुबंदी समितीच्या पदाधिकऱ्यांनी केला आहे.

The women were beaten to death | दारूबंदीसाठी महिलांची ठाण्यावर धडक

दारूबंदीसाठी महिलांची ठाण्यावर धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विकली जात आहे. गावा-गावातून दारुचा महापूर वाहतो आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या आर्शिवादानेच हा सर्र्वप्रकार सुरु असल्याचा आरोप स्वामीनी दारुबंदी समितीच्या पदाधिकऱ्यांनी केला आहे.
आष्टी हे तालुक्यातील अवैध दारु विक्रीचे मुख्य केंद्र बनले आहे. येथील शेकडो महिलांनी आतापर्यंत अनेक वेळा पोलीस ठाण्यात चकरा मारुन अवैध दारुबंदीची मागणी केली. परंतु पोलिसांचे दारुविक्रेत्यांशी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुलेही दारुच्या आहारी जात आहे. भांडण-तंटे ही नित्याची बाब झाली आहे. या गावासारखीच स्थिती तालुक्यातील इतर गावांची आहे. दारुबंद न केल्यास येणाºया काळात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यासाठी कळंब पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार, मनिषा काटे, प्रशांत भोयर, अशोक उमरतकर, अभिलाष नीत, आकाश काटे, पवन कासार, प्रकाश गेडाम, अनिकेत जळीत, मंदा गुरवे, मंगला आत्राम, तुळसा मेश्राम, इंदिरा रोहनकर, संजीवनी घोडमारे, वैशाली घोडाम, सुशिला बोरझवडे, भगीरथा घोडमारे, कांता घोडमारे आदी उपस्थित होते.

Web Title: The women were beaten to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.