घाटंजी येथे महिला जनजागृती कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:16 PM2019-03-04T21:16:40+5:302019-03-04T21:16:54+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व तालुका अभियान व्यवस्थापक कक्षातर्फे (उमेद) येथील गजानन महाराज मंदिर सभागृहात श्रमयोगी मानधन योजनेचा मेळावा घेण्यात आला. ग्राम संघ, महिला बचत गट यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व इतर महिलांकरिता जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व तालुका अभियान व्यवस्थापक कक्षातर्फे (उमेद) येथील गजानन महाराज मंदिर सभागृहात श्रमयोगी मानधन योजनेचा मेळावा घेण्यात आला. ग्राम संघ, महिला बचत गट यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व इतर महिलांकरिता जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.
अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मंगेश आरेवार होते. नायब तहसीलदार मेंढे, कृषी अधिकारी मनीषा पाटील, अरुण कांबळे, मडूरंध नांदेकर, अजय घोडाम, वर्ष बोरकर, संतोष पवार, संगीता पवार, उमेश मेश्राम आदी मंचावर उपस्थित होते. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे निकष, अटी व अर्ज कुठे भरायचे, याबाबत बीडीओ मंगेश आरेवर यांनी माहिती दिली.
कार्यशाळेत महिलांसाठीच्या सामाजिक योजना, संजय गांधी, श्रावण बाळ, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, याबाबत अरुण कांबळे यांनी माहिती दिली. नायब तहसीलदार मेंढे यांनी मतदार जनजागृती बाबत माहिती दिली. बँकेच्या विविध योजनांची माहिती तालुका व्यवस्थापक सुभाष गायकवाड यांनी दिली. अजय घोडाम यांनी आॅनलाईन केंद्राबाबत माहिती देऊन मोफत नोंदणी करण्याबाबत आवाहन केले. सरिता वाल्कर यांनी प्रास्तविक, संचालन कलेश्वर लेनगुरे यांनी केले. ‘उमेद’ प्रकल्पाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. आभार जितेंद्र मुनेश्वर यांनी मानले.