पांढरकवडा येथे महिलांचा सन्मान
By admin | Published: March 14, 2016 02:40 AM2016-03-14T02:40:59+5:302016-03-14T02:40:59+5:30
समाजातील कर्तृत्वान आणि ज्ञान संपन्न स्त्रियांचा गौरव करणे ही, सुसंस्कृत समाजाची कसोटी असते. असे कार्य करणारी संस्था ही समाजातील आदर्श संस्था असते, ...
पांढरकवडा : समाजातील कर्तृत्वान आणि ज्ञान संपन्न स्त्रियांचा गौरव करणे ही, सुसंस्कृत समाजाची कसोटी असते. असे कार्य करणारी संस्था ही समाजातील आदर्श संस्था असते, असे गौरवोद्गार सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. आशा देशमुख यांनी काढले.
येथील केशरबाई चाहल प्रतिष्ठान आणि ज्येष्ठ महिला संघातर्फे केशरबाई चाहल यांच्या स्मृती दिनानिमित्त गुरूवारी आयोजित कवियित्री प्रा.उर्मिला निनावे, मराठीच्या अधिव्याख्याता डॉ. अन्नपूर्णा चौधरी, गंगाबाई मंचलवार यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. रमेश जलतारे होते. डॉ.देशमुख पुढे म्हणाल्या, ‘स्त्रियांना अजूनही उपेक्षित आणि वंचित जीवन जगावे लागते,’. अगदी सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य असलेल्या काव्यातून स्त्रियांची दु:खे व्यक्त करण्याचा प्रा.निनावे, प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने पी.एच.डी.चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉ.अन्नपूर्णा चौधरी, अपंग, असहाय्य रोग्यांना सेवा देणाऱ्या गंगाबाईचा सत्कार करताना प्रा.डॉ.देशमुख गहिवरून आल्या होत्या.
या प्रसंगी प्रा.निनावे, डॉ.चौधरी, गंगाबाई यांचा शाल व श्रीफळ देऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. प्रा.निनावे, डॉ.चौधरी यांनी सत्काराला उत्तर दिले. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष डॉ.अजितसिंह यांनी केले. गंगाबाई यांचा परिचय उषा जाट यांनी करून दिला. यावेळी राहुल देवतळे, तन्वीर शेख, चंदाताई परचाके यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)