शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात ‘महिला सन्मान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:41 AM2021-03-10T04:41:43+5:302021-03-10T04:41:43+5:30
पुसद : शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या सन्मानार्थ व्याख्यान आयोजित करण्यात आले ...
पुसद : शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या सन्मानार्थ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रम अधिकारी प्रा. गजानन जाधव यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला. विभागीय समन्वयक प्रा. विशाल जाधव यांनी ‘जागर स्त्रीशक्तीचा जिजाऊ सावित्रीचा’ या विषयावर विचार मंथन केले. सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनेच नाही तर किंबहुना एक पाऊल पुढे टाकणाऱ्या मुलींना वंशाचा दिवा का मानू नये, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. ऑनलाईन कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय उंचेकर तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक ज्योती तगल्लपलेवाड, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अर्चना पाल आदी उपस्थित होते. स्नेहल हनवते यांच्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य विजय उंचेकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. गजानन जाधव यांनी तर साक्षी गोटे हिने आभार मानले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डी. आर. हिंगनकर, संजय निकम, गजाभाऊ भगत, सारिका जाधव, अर्चना वाघमारे, सारंग कोरटकर, प्रा. योगिता काष्टे विद्यार्थी प्रतिनिधी रोहन केवटे आदींनी परिश्रम घेतले.