रोजगारासाठी महिलांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:12 PM2019-03-05T22:12:34+5:302019-03-05T22:13:28+5:30
नगरपरिषदेची हद्दवाढ केल्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यवतमाळ पालिकेत लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या आहेत. आता त्या गावांना अ दर्जाच्या पालिकेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे येथे रोजगार हमी योजनाच राबविता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेची हद्दवाढ केल्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यवतमाळ पालिकेत लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या आहेत. आता त्या गावांना अ दर्जाच्या पालिकेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे येथे रोजगार हमी योजनाच राबविता येत नाही. त्यामुळे अनेक महिला व युवकांचा रोजगार हिरावला आहे. येथे राहेयोतून कामे उपलब्ध करावीत यासाठी पिंपळगाव येथील महिलांनी सोमवारी आंदोलन केले.
नगपरिषदेत पिंपळगाव, मोहा, लोहारा, वाघापूर, वडगाव, उमरसरा, भोसा या ग्रामपंचायतींचा समावेश झाला. त्यामुळे ग्रामीण भागात राबविली जाणाऱ्या रोजगार हमी योजनेतील कामे बंद झाली. परिणामी परंपरागत काम करणाऱ्या महिला व पुरूषांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली. सलग तीन वर्षापासून येथे रोजगार हमी योजनेतून एकही काम देण्यात आले नाही. रोहयोचे हक्काचे काम का मिळत नाही, याची विचारणा करण्यासाठी महिला रोहयो कार्यालया गेल्या. तेथे त्यांना सांगण्यात आले की, या सातही ग्रामपंचायतींना आता अ दर्जाच्या नगपरिषद क्षेत्रात समाविष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासाठी असलेले ही योजना येथे राबविता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. हद्द वाढ झाल्याने नवीन क्षेत्रात सुविधा कोणत्याच मिळाल्या नाहीत उलट, हातचे काम गेल्याने उपासमारीची वेळ आल्याचे या महिलांनी सांगितले.
आता शहरातील बांधकाम ठप्प पडली आहेत. रेतीच उपलब्ध नसल्याने बांधकाम नाही. परिणामी बांधकामावर काम करणाºया मजूरांच्या हाताला कोणतचे काम नाही. घरची चूल पेटत नसल्याने या मजुरांनी रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी केली. मात्र येथेही कायदेशीर बाबींचा अडसर आला आहे. अशा स्थितीत रोजगार नसल्याने या महिलांपुढे आंदोलना शिवाय कोणताच पर्याय नाही. पिंपळगाव येथील विसावा कॉलनीतील महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांना वेळेत रोजगार उपलब्ध करून न दिल्यास दररोज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा या महिलांनी दिला आहे. रोजगारासाठी त्यांनी तिरंगा चौकात मंगळवारी धरणे दिले.
यावेळी छबु जाधव, अंजु राऊत, कोमल मालाधारी, रमा बावणे, मंदा नागदेवते, कविता खडसे, शिला वानखेडे, लिला गवई, अनिता पाचलकर, बेबी नागपूरे, अर्चना बुटले, शोभा जामुळकर, सविता टिके, सारिका फटे, सविता देशमुख, सोनाबाई मात्रे, सुनंदा मात्रे, मंदा गेडाम रेखा नंदे, ज्योती नंदे, रंजना पिल्लारे, सुनिता माने, दुर्गा तुपट, सुनंदा आडे यांच्यासह ७० महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.