सुदृढ पिढी घडविण्याची जबाबदारी स्त्रियांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 09:48 PM2018-01-15T21:48:52+5:302018-01-15T21:49:22+5:30
क्रांतिज्योती सावित्रीआई फुले, राष्ट्रपिता जोतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन येणारी नवी सुदृढ पिढी काळाच्या उदरातून जन्माला घालून ती घडविण्याची जबाबदारी ....
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : क्रांतिज्योती सावित्रीआई फुले, राष्ट्रपिता जोतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन येणारी नवी सुदृढ पिढी काळाच्या उदरातून जन्माला घालून ती घडविण्याची जबाबदारी महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे, असे विचार सत्यशोधक विचारवंत प्रा. सुषमा अंधारे यांनी मांडले.
सत्यशोधक महिला विचार मंच आणि सत्यशोधक अध्यापक महिला विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथे क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंती समारोह पार पडला. ‘क्रांतिज्योती सावित्रीआर्इंचे कार्य व आजच्या बहुजन स्त्रियांचे अस्तित्व’ यावरील व्याख्यानात प्रा. अंधारे यांनी स्त्रियांवर गुलामीचा आसूड ओढणाºया वृत्तींवर प्रहार केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमल खंडारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संगीता डहाणे, शमीम बानो, प्रा.डॉ. सुनंदा वालदे, सुनीता निमकर, स्मिता पापडे, रितू ब्राह्मणे, संगीता वानरे, शीला ठवकर, कविता लोखंडे आदींची उपस्थिती होती. राजेंद्र पडोळे, मनीषा पडोळे, ऋषभ पडोळे, ज्ञानेश्वर गोरे, बी.एस. गजभिये, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
प्रसंगी ‘अॅट्रॉसिटी’ सिनेमा पोस्टर लाँच करण्यात आले. ‘मी मुक्ता साळवे’ हा एकपात्री प्रयोग वंदना डगवार यांनी सादर केला. सत्यशोधक विचार मंचच्या अध्यक्ष सुनीता काळे यांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका मांडली. संचालन गीता दरणे यांनी, तर आभार अपर्णा लोखंडे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी महिला मंचच्या उपाध्यक्ष माया गोबरे, माधुरी फेंडर, नम्रता खडसे, वैशाली फुसे, अनिता गोरे, कल्याणी मादेशवार, वर्षा महाजन, शोभना कोटंबे, रेखा कनाके, सुनंदा मडावी, कल्पना नागरीकर, विशाखा गजभिये, इंदू कांबळे, नंदा गुगलिया, सिंधू धवने, सविता हजारे, जयश्री भगत, वंदना डवले, रेखा कोवे, शीतल राऊत, प्रमिला पारधी, प्रा. श्रद्धा धवने, प्रेमाताई गिरी, संजीवनी बारी, मीनाक्षी काळे, उत्तरा ढाणके, मनोरमा खसाळे, संध्या दत्ताणी आदींनी पुढाकार घेतला.