दारूदुकानासमोर महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:10 AM2017-09-17T00:10:22+5:302017-09-17T00:10:35+5:30

तालुक्याच्या कोठा (वेणी) येथील शासनमान्य दारू दुकानातून अवैधपणे दारू विकली जाते. गावातच नव्हे तर, आजूबाजूच्या २५ गावासह वर्धा जिल्ह्यातही या गावातून दारूचा पुरवठा होतो.

Women's stance in front of Daruducha | दारूदुकानासमोर महिलांचा ठिय्या

दारूदुकानासमोर महिलांचा ठिय्या

Next
ठळक मुद्देवेणी कोठा : शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याने संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तालुक्याच्या कोठा (वेणी) येथील शासनमान्य दारू दुकानातून अवैधपणे दारू विकली जाते. गावातच नव्हे तर, आजूबाजूच्या २५ गावासह वर्धा जिल्ह्यातही या गावातून दारूचा पुरवठा होतो. त्यामुळे वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सदर दारू दुकान बंद करावे या मागणीसाठी परिसरातील अनेक गावातील महिलांनी शनिवारी या दारू दुकानासमोर ठिय्या दिला.
१४ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांकडून परवानगी मिळाल्याने सकाळी १० वाजतापासूनच महिलांनी या आंदोलनात आक्रमकपणे सहभाग घेतला. गावच्या मध्यवस्तीत असलेले दारू दुकान येत्या पाच दिवसात बंद करण्याचा अल्टीमेट देण्यात आला.
स्वामिनीचे जिल्हा संयोजक महेश पवार, तालुका संयोजक मनीषा काटे, शेतकरी संघटनेचे संजय कोल्हे आदींनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले. बिट जमादार विजय बोंबेकर यांच्यामुळे परिसरात दारु विक्री फोफावली. बोंबेकर यांचा दारुविक्रीला नेहमीच छुपा पाठिंबा राहिल्यामुळे त्यांना तत्काळ हटविण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली.
या आंदोलनात अनिकेत जळीत, प्रशांत भोयर, निखिल अंबुलकर, मंगला आत्राम, सुशीला चाफले, इंदिरा रोहणकर, लक्ष्मी सहस्त्रबुध्दे, निर्मला ठाकरे, तुळसा मेश्राम, शंकुतला सहस्त्रबुध्दे, प्रणिता नागतोडे, रंजना खसाळे, गीता जहाजपूरे, रेखा भगत, पोलीस पाटील उमेश निमकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू कदम, गजानन काजळे, राहुल निकुरे, आष्टीचे सरपंच लक्ष्मण घाटोळे, पोलीस पाटील विजय गाडेकर, प्रमोद तायडे, चंद्रकला ठाकरे, संगीता कुबडे, निर्मला घोडमारे, रंजना घोडमारे, कांता घोडमारे, भाग्यलता घोडमारे, शोभा घोडमारे, सुनीता गोल्हर, सिंधू नारनवरे, मंजिरी घोडमारे, शांता पडोळे आदींनी सहभाग नोंदविला.
 

Web Title: Women's stance in front of Daruducha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.