'मराठवाड्याचे राजकारण' या शब्दावरून दोन कृषीसहाय्यकात कार्यालयात फ्रीस्टाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 06:52 AM2019-07-23T06:52:11+5:302019-07-23T06:52:15+5:30
हा वाद सोडण्यासाठी इतर कृषी सहाय्यक धावले पण तोपर्यत सिद्धार्थला डोक्याला मार लागला होता. त्याला तातडीने नेर शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले.
नेर(यवतमाळ) -- नेर कृषी कार्यालयात 'मराठवड्याचे राजकारण' या शब्दावरून दोन कृषी सहाय्यकात कृषी अधिकाऱ्यासमोर फ्री स्टाईल झाल्याची घटना सोमवारी सांयकाळी पाच वाजता घडली. यात एक कृषी सहाय्यक गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे सूरवातीला हे प्रकरण मिटले अंसताना पुन्हा राञी नऊ वाजता दोघात शाब्दीक वाद झाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस सूत्रानी दिलेल्या माहीतीनूसार, नेर कृषी कार्यालयातील कामकाज सूरू अंसताना कृषीसहाय्यक सिद्धार्थ अंबादास हापसे यांनी आपले सहकारी भूंजग हजापूरे यांना तूम्ही मराठवाड्याचे लोक खूप राजकारण करता, मी संघटनेचा अध्यक्ष अंसताना दूसरा अध्यक्ष कसा ? असे म्हटले. यावर दूसरा कृषी सहाय्यक आरोपी प्रविण कालीदास ताकसाडे याने चिडून सिद्धातला फायबरच्या खूर्चीने मारहाण केली. दोघात फ्रीस्टाईल सूरू झाली. हा वाद सोडण्यासाठी इतर कृषी सहाय्यक धावले पण तोपर्यत सिद्धार्थला डोक्याला मार लागला होता. त्याला तातडीने नेर शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. कृषी सहाय्यकांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा हा वाद भडकल्याने राञी साडेदहा वाजता या प्रकरणी प्रविण ताकसाडे वर भादवी ३२४,५०४ नूसार गून्हा दाखल झाला.