वीज उपकेंद्रांचे काम अर्ध्यावर सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:00 AM2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:28+5:30
राळेगाव परिसराला पांंढरकवडा व यवतमाळातून वीज घेऊन पुरवठा केला जातो. या दोन्ही सेंटरचे लोड कमी करण्यासाठी राळेगाव येथे महापारेषण कंपनीने स्वतंत्र वीज उपकेंद्र उभे केले. सुमारे १५ कोटी रुपये बजेट असलेल्या या उपकेंद्राच्या उभारणीचा कंत्राट नाशिक येथील स्वाती एन्टरप्राईजेस या कंपनीला दिला गेला. मात्र कंपनीचे काम सुरुवातीपासूनच संथ गतीने सुरू होते. शेवटी-शेवटी तर ही कंपनी काम अर्ध्यावर सोडून निघून गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याच्या राळेगाव येथे महाराष्टÑ राज्य वीज महापारेषण कंपनीचे १३२ केव्हीचे उपकेंद्र तयार होत आहे. परंतु कंत्राटदार अर्ध्यावर काम सोडून गेल्याने कंपनीला तुकड्या-तुकड्या हे काम पूर्ण करावे लागत आहे.
राळेगाव परिसराला पांंढरकवडा व यवतमाळातून वीज घेऊन पुरवठा केला जातो. या दोन्ही सेंटरचे लोड कमी करण्यासाठी राळेगाव येथे महापारेषण कंपनीने स्वतंत्र वीज उपकेंद्र उभे केले. सुमारे १५ कोटी रुपये बजेट असलेल्या या उपकेंद्राच्या उभारणीचा कंत्राट नाशिक येथील स्वाती एन्टरप्राईजेस या कंपनीला दिला गेला. मात्र कंपनीचे काम सुरुवातीपासूनच संथ गतीने सुरू होते. शेवटी-शेवटी तर ही कंपनी काम अर्ध्यावर सोडून निघून गेली. अखेर शिल्लक काम तुकड्या-तुकड्या वेगवेगळ्या व्यक्तींना देऊन पूर्ण करावे लागले. हे संपूर्ण काम मात्र स्वाती एन्टरप्राईजेसच्याच नावावर लागणार असून तुकड्या-तुकड्यात केलेल्या कामाचा खर्च या कंपनीकडून वसूल केला जाणार आहे.
या कंपनीचा स्वत:चा सुपरवायझर किंवा साईड इन्चार्ज कधी दिसला नसल्याचे सांगितले जाते. या कंत्राटदारावर यवतमाळ व कळंब येथील बांधकाम साहित्य व इलेक्ट्रीकल साहित्य खरेदीची उधारीही असल्याचे सांगितले जाते. अखेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन या उपकेंद्राचे काम पूर्ण करावे लागत आहे. यवतमाळातील उपअभियंता सुटीवर असल्याने अमरावतीचे कार्यकारी अभियंता सुनील शेरेकर यांनी या कामावर देखरेख ठेवली आहे.
सद्यस्थितीत १५ कोटींच्या या उपकेंद्राची टेस्टींग झाल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात हे उपकेंद्र सुरू झालेले नाही. महावितरण कंपनीचे सहा फिडर राळेगावच्या या उपकेंद्राला कनेक्ट राहणार आहे. मात्र सध्या या फिडरचे काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण झाल्यानंतर उपकेंद्राची पुन्हा ट्रायल घेतली जाणार आहे. दोन-चार दिवसांचे काही काम पूर्ण केल्यानंतर हे उपकेंद्र कार्यान्वित होणार असल्याची माहिती आहे. उपकेंद्र सुरू झाल्यानंतर यवतमाळ व पांढरकवडा उपकेंद्रावरून वीज पुरवठ्याचा भार बºयाचअंशी कमी होणार आहे.
जुनेच ट्रान्सफार्मर लावले
नव्या उपकेंद्राला नवे ट्रान्सफार्मर अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदाराने जुने ट्रान्सफार्मर दुरुस्त करून लावल्याचे सांगितले जाते. या कंत्राटदाराने कामही वेळेत पूर्ण केले नाही.