‘महसूल’च्या संपाने काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:00 AM2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:17+5:30

शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असून नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. महसूल कर्मचाऱ्यांनी सहा टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. बुधवारी मागण्यांसदर्भात मंत्रालयात चर्चा झाल्यावरही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे गुरुवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले. राज्यभर सुरू असलेल्या संपाचे तीव्र पडसात जिल्ह्यात उमटले आहे.

Work on revenue ends | ‘महसूल’च्या संपाने काम ठप्प

‘महसूल’च्या संपाने काम ठप्प

Next
ठळक मुद्देकार्यालयात शुकशुकाट : ७०० कर्मचाऱ्यांचा सहभाग, सर्व तालुकास्थळी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य महसूली कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. जिल्हाभरातील महसूल कर्मचाºयांनी या संपात सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असून नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.
महसूल कर्मचाऱ्यांनी सहा टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. बुधवारी मागण्यांसदर्भात मंत्रालयात चर्चा झाल्यावरही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे गुरुवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले. राज्यभर सुरू असलेल्या संपाचे तीव्र पडसात जिल्ह्यात उमटले आहे.
नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड-पे ४६०० करण्यात यावा, महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहाय्यक करण्यात यावे, महसूल विभागाच्या आकृतीबंधाबाबत दांगट समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी, गृहविभागाच्या धर्तीवर महसूल कर्मचाऱ्यांची भरती करावी, वर्ग-४ वरून वर्ग-३ वर पदोन्नती करताना तलाठी संवर्गात पदोन्नती करावी, जुनी पेन्शन लागू करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. यवतमाळ येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत टाके, राज्य संघटक नंदू बुटे, सुधाकर राठोड, राजू मोट्टेमवार, देवानंद गरड, प्रदीप दुधे, आशिष जयसिंगपुरे, संजय भास्करवार, गोपाल शेलोकार, यामिनी कोरे, अमृता केदार, रोशनी राठोड आदींनी पुढाकार घेतला. यावेळी कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी निदर्शने केली.

दारव्हा येथेही संप
दारव्हा : महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे दारव्हा तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प पडले आहे. यासंपात महसूल कर्मचारी संघटनेचे अशोक निमकर, विनोद शेंदूरकर, सुधाकर राठोड, प्रल्हाद निंबर्ते, महेश साखरकर, भीमराव पाढेण, दीपक मोरे, भूषण पिंपळे, प्रकाश शिरे, प्रशांत माळवी, नवनीत शहाकार, विनोद फोपसे, नितीन जाधव, सचिन देशमुख, अमोल चव्हाण, चेतन चव्हाण, वासुदेव काळबांडे, प्रशांत ढंगारे, मुरलीधर काळे, प्रदीप पाचपोळ, मोरेश्वर राठोड, गणेश लांडे, संतोष इंगोले, रश्मी दरवरे, गंगाबाई देवतळे, यादव गायकवाड, गजानन लोखंडे, विलास टेकाम, सुमित्रा शेळके सहभागी झाले.

नेरमध्ये कामाचे तीनतेरा
नेर : येथेही महसूली कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने तहसीलमधील कामकाजाचे तीनतेरा वाजले आहे. या संपात संघटनेचे अध्यक्ष वसंत काटगळे, सचिव युवराज अंभोरे, सुधीर राठोड, सुनील जुनघरे, विवेश नलगुंडावार, अमित काटकर, नीलेश बारडे, सुभाष भोरे, सुशील जगताप, रामराव जाधव, अनिल मासाळ, रमेश सरके, राजू देशमुख, विजय काशीकर, डी.ए. गोलाइतकर, प्रतीभा गुल्हाने, पी.डब्ल्यू. पिसाळकर, प्रेमिला वरठी, निर्मला नाईकडा, बेले, राजूरकर, व्ही.एम. गुंडकवार उपस्थित होते.

Web Title: Work on revenue ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप