ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:41 AM2021-04-21T04:41:23+5:302021-04-21T04:41:23+5:30
फुलसावंगी : वारंवार शासनाला विनंती करूनही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने १९ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत ...
फुलसावंगी : वारंवार शासनाला विनंती करूनही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने १९ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी युनियनने एक दिवस काम बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला फुलसावंगी येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनीसुद्धा पाठिंबा दिला.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मागील अनेक दिवसांपासून शासनदरबारी धूळखात पडल्या आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन, निवृती वेतन लागू करणे, उपदान लागू करणे, भविष्य निर्वाह निधी, सुधारित किमान वेतन लागू करणे, वेतनासाठी लादलेली वसूली अट रद्द करणे, आकृतिबंधात सुधारणा करणे या मागण्या प्रलंबित आहे.
शासनाने मागण्यांकडे कानाडोळा केला. त्यामुळे येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय आंदोलन केले. यामध्ये सुदर्शन मारोती खंदारे, सय्यद वाजिद सय्यद जाबीर, गंगाधर लक्ष्मण पाईकराव, लक्ष्मण पाचंगे, नारायण शंकर तवर, मारोती तुकाराम भगत, शेख जानी शेख हबीब व इतर कर्मचारी सामील झाले होते.