वणी नगर परिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:31 AM2021-09-02T05:31:04+5:302021-09-02T05:31:04+5:30

ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर ३० ऑगस्टला झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करण्यात ...

Work stoppage agitation of Wani Municipal Council employees | वणी नगर परिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

वणी नगर परिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Next

ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर ३० ऑगस्टला झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. याबाबत उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठविण्यात आले. सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या माजीवाडा प्रभागात अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा हातगाडी फेरीवाला अमरजित यादव याने त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून या दोघांनाही गंभीर जखमी केले. यात पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पूर्णपणे तुटून रस्त्यावर पडली व उजव्या हाताला अंगठ्यासाह गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा येथील कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध करून कामबंद आंदोलन केले. एसडीओंना निवेदन देताना संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विजय महाकुलकर, उपाध्यक्ष माधव सिडाम, सचिव धम्मरत्न सदानंद पाटील, सहसचिव सुभाष आवारी, कोषाध्यक्ष महेश पारखी, संजय दखने, पांडुरंग मांडवकर, खुशाल भोंगळे, गोविंदवार, देवीदास जाधव, संजय ताराचंद, आशा चिंचोलकर, मनीषा लिखिते, साधना रामगीरवार व कर्मचारी उपस्थित हाेते.

Web Title: Work stoppage agitation of Wani Municipal Council employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.