४५ अंश तापमानातही पाणीदार गावासाठी काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 09:32 PM2019-04-29T21:32:07+5:302019-04-29T21:32:31+5:30

विदर्भात उष्णतेची लाट आहे. पारा ४५ अंशाच्या वर आहे. शहरातील नागरिक दहाच्या आत घरात आणि गावगाडा भरउन्हातही शेतशिवारात राबताना दिसत आहे. उन्हाळवाहीची कामे आणि वॉटरकप स्पर्धेसाठी गावकरी मेहनत घेत आहे. तर दुसरीकडे लग्नातील वºहाडाला भरउन्हातही नाचण्याचा मोह होत आहे.

Work for a well-maintained village at 45 degree temperature | ४५ अंश तापमानातही पाणीदार गावासाठी काम

४५ अंश तापमानातही पाणीदार गावासाठी काम

Next
ठळक मुद्देशहरात दहाच्या आत घरात : गाव भरउन्हात शेतशिवारात, युवा वर्गांसोबतच महिलांचाही मोठा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विदर्भात उष्णतेची लाट आहे. पारा ४५ अंशाच्या वर आहे. शहरातील नागरिक दहाच्या आत घरात आणि गावगाडा भरउन्हातही शेतशिवारात राबताना दिसत आहे. उन्हाळवाहीची कामे आणि वॉटरकप स्पर्धेसाठी गावकरी मेहनत घेत आहे. तर दुसरीकडे लग्नातील वºहाडाला भरउन्हातही नाचण्याचा मोह होत आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यानंतरही वॉटरकप स्पर्धेत लोक काम करत आहेत. जिल्ह्यातील ११८ गावे यात सहभागी आहेत. बांधबंदिस्तीसह विहीर पुनर्भरणाचे काम गावकरी करत आहे.
खरिपाचा हंगाम तोंडावर आहे. तत्पूर्वी वाहीची कामे, काडीकचरा वेचता यावा म्हणून शेतशिवारत मजूर भरउन्हातही काम करत आहे. कांदा काढणे, हळद उकळणे, भाजीपाला तोडणे इत्यादी कामे शेतशिवारात सुरू आहे. ही कामे करतानाच वॉटरकप स्पर्धेच्या कामातही सहभाग आहे.
सूर्याच्या निखाऱ्यापुढे नाचण्याचा आनंद
उष्णतेच्या लाटेतही लग्नाच्या तारखेचा सपाटा सुरू आहे. रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी लग्नाचा ठोक होता. या तारखांना उच्चांकी तापमान होते. तरी नाचणारे वºहाडी उल्हासात होते. भरउन्हात तासन्तास नाचल्याने लग्नाचा मुहूर्त टळला.
ग्रामीण भागाची क्षमता अधिक
प्रखर उन्हात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरिक अधिक वेळ काम करताना पाहायला मिळत आहे. यामुळे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात काम करण्याची अधिक स्फूर्ती असल्याचे चित्र पुन्हा पहायला मिळाले.

Web Title: Work for a well-maintained village at 45 degree temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.