जिल्हा परिषद अभियंत्यांचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:54 PM2018-03-19T22:54:13+5:302018-03-19T22:54:13+5:30
जिल्हा परिषद अभियंत्यांनी विविध मागण्यांसाठी लेखनी बंद आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाने दुष्काळी क्षेत्रातील टंचाईचे कामे प्रभावीत झाले आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्हा परिषद अभियंत्यांनी विविध मागण्यांसाठी लेखनी बंद आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाने दुष्काळी क्षेत्रातील टंचाईचे कामे प्रभावीत झाले आहे. पाणीटंचाईचा यामध्ये समावेश आहे. या कामाच्या मंजुरीसाठी कार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षरीची गरज आहे. कामबंद आंदोलनाने ही फाईलच थांबली आहे.
जिल्हा परिषद अभियंता संघटनेने राज्यभरात लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. पहिल्या टप्प्यातील आंदोलन दोन दिवस चालणार आहे. ३१ मार्चपर्यंत या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास बेमुदत आंदोलन होणार आहे. जिल्हा परिषद अभियंता संघटनेला शासन मान्यता देण्यात यावी, जिल्हा परिषद अभियंत्यांना प्रवास भत्त्यासाठी दरमहा १० हजार देण्यात यावे, जिल्हा परिषद अभियंता संवर्गातील आणि स्थापत्य संवर्गातील रिक्त पदे भरण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षेबद्दल लागू केलेला अद्यादेश रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष संजय मानकर, कार्याध्यक्ष प्रवीण येंडे, सचिव गणेश शिंगाणे, दीपक निचळ, अरविंद घरडे, रमेश कोरेटी, शशिकांत बोजेवार, आशीष तिमसे, पियूष कुरळकर, अलका मुंढे, मनोज जाधव, राजेंद्र लभाने, गणेश निमजे, प्रशांत ठमके, गोपाल उमाटे, वसंत भोकरे आदी उपस्थित होते.