उमरखेड तालुक्यात श्रमदानाची चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 09:55 PM2019-04-26T21:55:30+5:302019-04-26T21:55:58+5:30

सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. अशाच पद्धतीने तालुक्यातील ३०  गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलंया’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

Workers' clash in Umarkhed taluka | उमरखेड तालुक्यात श्रमदानाची चढाओढ

उमरखेड तालुक्यात श्रमदानाची चढाओढ

googlenewsNext
ठळक मुद्देपाण्यासाठी ३० गावांचे प्रयत्न : एकजुटीनं पेटलं रान तुफान आलंया ! 

अविनाश खंदारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. अशाच पद्धतीने तालुक्यातील ३०  गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलंया’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत भाग घेत या  गावांनी नवनिर्माणाचा चंग बांधला आहे.
खऱ्या अर्थाने या गावांनी ८ एप्रिलच्या रात्री १२ वाजतापासून अधिकृतपणे स्पर्धेत सहभागी होत जलव्यवस्थापन करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला गावागावांतील जलदुतांनी स्पर्धेसंबंधी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गावातील लोकांना एकत्र करीत गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला. विशेष म्हणजे, अनेक गावातील मोजके लोक शेती तर इतर सर्व रोजमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. सकाळी ६ ते दुपारी २ या वेळात आबालवृद्धांसह सर्व गाव जलसंधारणाच्या कामात स्वयंस्फूर्तीने उतरत आहे.
या गावात सीसीटी, एलबीएस, कंटूर बांध, ग्रेडेड कंटूर बांध यासह इतरही कामे उत्कृष्ट व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण केले आहे. त्यामुळे बहुतांश गावे महाराष्ट्रात गुणतालिकेत अव्वल  ठरली आहेत.
गटशिक्षणाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन
गावे पाणीदार व्हावी यासाठी   सहाय्यक गटविकास अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी सचिन खुडे हे पुढे सरसावले आहेत. बहुतांश वेळ गावकºयांना मार्गदर्शन व त्यांच्यासोबत श्रमदान करण्यात ते घालवित आहेत.
अनेक गावांमध्य त्यांनी सहपरिवार श्रमदान करुन लोकांना प्रोत्साहित केले.
विद्यार्थ्यांच्या श्रमदानाने मोठ्यांना प्रेरणा
तालुक्यातील करंजी या गावात शाळकरी विद्यार्थ्यांचा श्रमदानात असलेला पुढाकार सर्वांना हत्तीचे बळ देणारा ठरतो आहे. त्यांच्यापासून लोकांनाही आपसूकच प्रेरणा मिळते. गावातील लहान मुले जर  दुष्काळाशी दोन हात करण्यात सहभाग घेत असतील, तर आपण का नाही, अशी भावनाही अनेकांच्या मनात जागृत झाली आहे. यामुळे उपक्रमात गावकरी उत्साहाने सहभागी झाले आहेत.   

उमरखेड तालुक्यातील ३० गावांमध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्याने सहभाग घेतला आहे. यामध्ये तालुका कृषी विभाग, पंचायत समिती, महसूल तसेच अनेक सामाजिक संस्थांनीही सक्रीय सहभाग नोंदवला आहे.
- जयश्री वाघमारे,
गटविकास अधिकारी, उमरखेड

Web Title: Workers' clash in Umarkhed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.