रमाई आवास योजनेच्या लाभासाठी कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:10 PM2018-02-03T22:10:08+5:302018-02-03T22:10:46+5:30
रमाई आवास योजनेच्या लाभासाठी शनिवारी नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले. येत्या १५ दिवसात घरकुलाविषयी निर्णय न झाल्यास अन्नत्यागचा इशारा देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रमाई आवास योजनेच्या लाभासाठी शनिवारी नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले. येत्या १५ दिवसात घरकुलाविषयी निर्णय न झाल्यास अन्नत्यागचा इशारा देण्यात आला आहे.
मागील सात वर्षांपासून ४३८ कुटुंब रमाई आवास योजनेंंतर्गत घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे. यासंदर्भात गुरुदेव युवा संघाने यापूर्वी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. त्यावर नगरपरिषदेने कुठलीही कारवाई केली नाही. आज वंचित लोकांसह गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा नेला. सर्व वंचितांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्याची मागणी केली.
मोर्चात अनिता किनाके, विठाबाई मुंगले, शीलाबाई जाधव, गंगाबाई मेश्राम, लताबाई टेंभुर्णे, कांताबाई बागडे, संगीताबाई ससाणे, अंजनाबाई मुंगले, चंदाबाई देशमुख, सुनीता कांबळे, भीमाबाई पाटील, सुजाता मेश्राम, कमलाबाई चौधरी, शारदा अंबादे, रत्नाबाई टेंभुर्णे आदींनी सहभाग नोंदविला.