पंजाबराव देशमुखांचे कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:13 PM2017-12-29T23:13:12+5:302017-12-29T23:13:22+5:30
भारतातील शेतकरी व कष्टकरी समाजाचा विकास हेच भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचे ध्येय होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेती व शिक्षणाच्या प्रगतीसाठी खर्ची घातले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारतातील शेतकरी व कष्टकरी समाजाचा विकास हेच भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचे ध्येय होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेती व शिक्षणाच्या प्रगतीसाठी खर्ची घातले. त्यामुळेच ते विद्यार्थ्यांचे पे्ररणास्थान ठरतात असे प्रतिपादन ‘डायट’चे प्रा. डॉ. प्रशांत गावंडे यांनी येथे केले.
येथील शिवाजी विद्यालयात देशाचे पहिले कृषीमंत्री, शिक्षणमहर्षी भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १९९ व्या जयंती उत्सवात ते बोलत होते. उद्घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अॅड. भैयासाहेब पावडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव ठाकरे, डॉ. प्रभाकरराव काळमेघ, मुख्याध्यापक के.एस. वानखडे, पर्यवेक्षक जी.एस.कणसे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पांडूरंग गदाई, एम.टी.बाभळे, धैर्यशिल चौधरी उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रशांत गावंडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक के.एस. वानखडे यांनी, संचलन अनिकेत आगलावे यांनी तर आभार संयोजिका यु.एस.येवले यांनी मानले. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.