‘जेडीआयईटी’मध्ये कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:06 PM2017-12-14T23:06:38+5:302017-12-14T23:07:04+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. ‘इमरजिंग ट्रेड इन टिचिंग, लर्निंग प्रॅक्टीसेस’ असा या कार्यशाळेचा विषय होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. ‘इमरजिंग ट्रेड इन टिचिंग, लर्निंग प्रॅक्टीसेस’ असा या कार्यशाळेचा विषय होता. उद्घाटनप्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, नाशिक येथील उद्योग सल्लागार व द कॅटालिस्ट बिझनेस कन्सलटंट प्रदीप घारे, टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, कार्यशाळा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले उपस्थित होते.
माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. उद्घाटनपर मार्गदर्शनात प्रदीप घारे यांनी व्यक्तीचे कार्यालयीन काम व त्यासंबंधी कार्यालयीन हितसंबंध याविषयी माहिती दिली. विचार व्यक्त करण्याच्या विविध प्रकाराबद्दल त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत पीआयईटी कॉलेज इंजिनिअरिंग नागपूरचे डॉ. एस.के. देशमुख, नागपूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीकचे प्रा. डी.एस. कुलकर्णी, यवतमाळ येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीकचे प्राचार्य एन.एन. शेंडे यांच्यासह प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, डॉ. एस.एम. गुल्हाने, डॉ. अतुल बोराडे, डॉ. आर.एस. तत्त्ववादी, डॉ. यू.व्ही. कोंगरे, डॉ. पी.एम. पंडित, प्रा. जी.एस. काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. ए.पी. पारडे, प्रा. पी.एम. पंडित, प्रा. ए.आर. राठोड, प्रा. पी.एस. रहांगडाले आदींनी शैक्षणिक प्रणालीसंंबंधी मार्गदर्शन केले.
संचालन स्वप्नजा राऊत, आभार कार्यशाळा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले यांनी मानले. विविध अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा आदींच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा पार पडली. यशस्वीतेसाठी प्रा. अजय राठोड, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंकर, प्रा. सुरज पाटील, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे आदींनी परिश्रम घेतले.