मुळावा येथे नॅकवर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:46 AM2021-09-27T04:46:14+5:302021-09-27T04:46:14+5:30
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भदंत धम्मसेवक महाथेरो होते. प्रमुख पाहुणे म्हणून भदंत दयानंद महाथेरो, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. अबरार शेख ...
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भदंत धम्मसेवक महाथेरो होते. प्रमुख पाहुणे म्हणून भदंत दयानंद महाथेरो, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. अबरार शेख उपस्थित होते. प्रा. शेख यांनी नॅक मूल्यांकन किती गरजेचे आहे व ते करण्यासाठी काय काय करावे लागते, या संदर्भात सात मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. यामध्ये भीतिदायक कुठलाही प्रकार नसून महाविद्यालयांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये आपण काय काय केले, त्याचा डाटा जमा करणे व तो सादर करणे म्हणजे नॅकचे मूल्यांकन करणे होय, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेला डॉ.डी.एस. पवार, प्रा. ज्योती काळबांडे, प्रो. अनिल काळबांडे, प्रा. प्रदीप इंगोले, डॉ. राहुल धुळधुळे, डॉ. जयमाला लाडे, प्रा. क्रांती मुनेश्वर, पांडुरंग शिंदे, लक्ष्मण केवटे, रमेश ढोले, गौतम वाघमारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. विश्वास दामोदर यांनी केले.