‘जेडीआयईटी’त एनबीए एक्रेडिटेशनवर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:50 PM2017-12-19T23:50:22+5:302017-12-19T23:52:04+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग आणि इलेक्ट्रिकल विभागाच्या संयुक्त विभागाने ‘नॅक व एनबीए एक्रेडिटेशन’वर सहा दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

Workshop on NBA Accreditation in JediT | ‘जेडीआयईटी’त एनबीए एक्रेडिटेशनवर कार्यशाळा

‘जेडीआयईटी’त एनबीए एक्रेडिटेशनवर कार्यशाळा

Next
ठळक मुद्देयेथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग आणि इलेक्ट्रिकल विभागाच्या संयुक्त विभागाने....

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग आणि इलेक्ट्रिकल विभागाच्या संयुक्त विभागाने ‘नॅक व एनबीए एक्रेडिटेशन’वर सहा दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशन (एआयसीटीई), इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्यूकेशन (आयएसटीई) प्रायोजित होती.
कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई येथील सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.जी. करंदीकर यांच्या हस्ते माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. पदविका व पदवीचे शिक्षण देणाºया अनेक वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला.
उद्घाटनानंतर डॉ. करंदीकर यांनी नॅक आणि एक्रेडिटेशनसंबंधी तीन सत्रामध्ये मार्गदर्शन केले. अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.ए. मिश्रा यांचे ‘तंत्रशिक्षणेतर महाविद्यालयांना नॅकचे निकष’, बडनेरा येथील राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. पी.व्ही. इंगोले यांचे ‘शैक्षणिक अभ्यासक्रम व संशोधनासंबंधी नॅकचे निकष’, जेडीआयईटीचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉ. संजय गुल्हाने यांचे ‘ब्लूम्स टॅक्सोनॉमी’, नॅक समन्वयक डॉ. एस.व्ही. भालेराव, डॉ. पी.एन. श्रीराव यांचे ‘नॅक एसएसआर’ या विषयावर मार्गदर्शन झाले.
पदविका व पदवी महाविद्यालयांना अनिवार्य असलेल्या नॅक व एनबीए एक्रेडिटेशनसंबंधी नवीन निकषाबद्दल प्राध्यापकांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे या कार्यशाळेत देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रगती पवार यांनी केले. आभार डॉ. पंकज पंडित यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, कार्यक्रम संयोजक डॉ. संजय गुल्हाने आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Web Title: Workshop on NBA Accreditation in JediT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.