जिल्हा परिषदेत कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:50 PM2017-11-03T23:50:52+5:302017-11-03T23:51:05+5:30
माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करीत शुक्रवारी जिल्हा परिषदेत कामबंद आंदोलन करण्यात आले. यात कर्मचारी संघटनांसह राजपत्रिक अधिकारीही सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करीत शुक्रवारी जिल्हा परिषदेत कामबंद आंदोलन करण्यात आले. यात कर्मचारी संघटनांसह राजपत्रिक अधिकारीही सहभागी झाले होते.
गुरुवारी सायंकाळी वणी येथील स्वप्नील धुर्वे व अन्य काही जणांनी शिक्षणाधिकारी वंजारी यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या अंगावर शाई टाकून मारहाण करण्यात आली. या घटनेचा महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना व जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील कर्मचाºयांच्या संघटनांनी निषेध केला. आरोपींवर पोलिसांनी विविध कलामान्वये गुन्हे नोंदविले आहेत. मात्र कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) लावावे, अशी मागणी करीत शुक्रवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दिवसभर जिल्हा परिषदेत शुकशुकाट पाहावयास मिळाला.
आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी राजेश कुळकर्णी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, अरुण मोहोड, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय देशमुख, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, समाधान वाघ, अमित राठोड, रमेश दोडके आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा मुख्याध्यापक संघाची निषेध सभा
शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना झालेला मारहाणीचा यवतमाळ जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे निषेध नोंदविण्यात आला. शिक्षणाधिकारी कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रकाश भुमकाळे, सचिव भुमन्ना बोमकंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध सभा झाली. यावेळी निरज डफळे, विनोद संगीतराव, विजय विसपुते, इमरान खान, इरशाद पठाण, नागोराव चौधरी, महेंद्र ठाकूर, गायकवाड, धवने, भोयर, चिंचोरे, मांजरे, ताजने, कश्यप, ममता देव, देशपांडे, दहीवलकर, कोकाटे, संगीता डांगे, पांडुरंग साखरकर आदी उपस्थित होते.
कास्ट्राईबचे सीईओंना निवेदन
यवतमाळ : जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यावरील हल्ल्याचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने निषेध नोंदविला. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. मारहाणप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. महासंघाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भवरे यांच्या नेतृत्त्वात निवेदन दिले. तसेच जिल्हा परिषदेत झालेल्या सभेतही त्यांनी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघातर्फे दिगांबर जगताप, रमाकांत मोहरकर यांनी सदर घटनेचा निषेध नोंदवून कारवाईची मागणी केली.