पैनगंगा अभयारण्यात जागतिक व्याघ्र दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:38 AM2021-08-01T04:38:46+5:302021-08-01T04:38:46+5:30
ढाणकी : उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात बिटरगाव वनपरिक्षेत्रात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात आला. २०१० पासून दरवर्षी ...
ढाणकी : उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात बिटरगाव वनपरिक्षेत्रात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात आला.
२०१० पासून दरवर्षी २९ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. वाघांचे संरक्षण झाले तरच पुढच्या पिढीला वाघ काय असतो, हे कळेल. त्यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना बिटरगाव समितीचे अध्यक्ष ॲड. विनोद मामीडवार, तानाजी शिरगिरे, वनरक्षक मारुती जाधव, वनरक्षक प्रकाश पाईकराव यांनी विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्राधिकारी (वन्यजीव) ओमप्रकाश पेंदोर होते.
पेंदोर यांनी वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करणे काळाची गरज असून, पैनगंगा अभयारण्यात वाघांची संख्या वाढली तर वनांचे संरक्षण आणि संवर्धनाकरिता मोठी मदत होऊन पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. पैनगंगा अभयारण्य हे ताडोबा अभयारण्यापेक्षा क्षेत्रफळाने जास्त आहे. त्यामुळे पैनगंगा अभयारण्यात वाघांची संख्या वाढण्यास काही वेळ लागणार नाही. पर्यटकांच्या दृष्टिकोनातून मन्याळी गेट अतिशय चांगल्या ठिकाणी असल्यामुळे पर्यटकांना पर्यटन करण्यास कोणतीही अडचण जाणार नाही, असे सांगितले.
कार्यक्रमाला म्हणून डॉ. तिवारी, शंकर कांबळे, वामन मुनेश्वर, राजू पिटलेवाड, अनंत सानप, भाऊ घोडमारे उपस्थित होते. सूत्रसंचालन वनरक्षक हनुमंत धुळगंडे यांनी केले.
310721\fb_img_1627715092753.jpg
पैनगंगा अभयारण्यात जागतिक व्याघ्र दिन साजरा.