विश्वातील पहिले मनोवैज्ञानिक भगवान बुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:30 AM2021-05-28T04:30:26+5:302021-05-28T04:30:26+5:30
उमरखेड : सृष्टीमध्ये मानवी मनाचा विकार जाणून त्यावर उपाय म्हणून दुःख मुक्तिचा मार्ग पहिल्यांदा भगवान बुद्ध यांनी आर्यअष्टांगिक मार्गाद्वारे ...
उमरखेड : सृष्टीमध्ये मानवी मनाचा विकार जाणून त्यावर उपाय म्हणून दुःख मुक्तिचा मार्ग पहिल्यांदा भगवान बुद्ध यांनी आर्यअष्टांगिक मार्गाद्वारे दिला. त्यामुळे मानवी मनाचा विचार करणारे जगातील ते पहिले मनोवैज्ञानिक होते, असे मत साहित्यिक प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांनी व्यक्त केले.
स्थानिक सुमेध बुद्ध विहारामध्ये ज्ञानसाधनेच्या बळावर अवघ्या विश्वाला प्रकाशमान करणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांची २५६५वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रा. डॉ. काळबांडे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सुरुवातीला सुमेध बोधी विहार समितीचे सचिव उपा, भीमराव सोनुले यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महिला मंडळाच्या वतीने सामूहिक त्रिशरण, पंचशील व गाथा यांचे पठाण करण्यात आले.
यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष केशरबाई पाईकराव, शारदा निथळे, गयाबाई वाठोरे, अनिता पाटील, जिजाबाई लोमटे, मनोरमा भरणे, वर्षा गायकवाड, मायाताई हापसे, तृप्ती निथळे, सीमा कावळे, लता कावळे, रंजना आळणे, प्रतिमा पाटील, नीशा काळबांडे, तेजस गायकवाड, कैलास ठोके आदी उपस्थित होते. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून विहारामध्ये कार्यक्रम घेण्यात आला. सूत्रसंचालन बौद्धाचार्य प्रा. गजानन दामोदर यांनी केले. आभार संतोष निथळे यांनी मानले.