वणीत पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 10:08 PM2018-01-14T22:08:58+5:302018-01-14T22:09:10+5:30

येथील जिवनदायीनी निर्गुडा नदी आटल्याने वणीत पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी साकडे घातले आहे.

Worn in water for water | वणीत पाण्यासाठी हाहाकार

वणीत पाण्यासाठी हाहाकार

Next
ठळक मुद्देनिर्गुडा आटली : नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील जिवनदायीनी निर्गुडा नदी आटल्याने वणीत पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी साकडे घातले आहे.
निर्गुडा नदीतील पाणीसाठा संपल्याने नवरगाव धरणातून पाणी सोडावे लागते. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने नवरगाव धरणात पुरेसा जलसाठा झाला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या सुरूवातीलाच ३८ टक्के जलसाठा या धरणात शिल्लक राहिला आहे. आता मार्च महिन्यापर्यंत पाणी कसे पुरणार, याची चिंता वाढली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवस पुरेल एवढे १७ दलघमी पाणी नदीत सोडण्याचे आदेश दिले. या १७ दलघमी पाणी वितरणासाठी योजना आखण्याचे सूचविले. त्यामुळे शहरात तीन दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
गेल्या ७ जानेवारीला या नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता १७ जानेवारीला १७ दशलक्षघमी पाणी मिळणार होते. परंतु त्याआधीच नदीतील जलसाठा संपल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. शहरात सध्या तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. परंतु पाण्यासाठी हाहाकार झाल्याने सोमवारपासून १० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
याबाबत नवरगाव प्रकल्पाच्या एका कर्मचाºयांना विचारणा केली असता, धरणात केवळ ३६.५० दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून रविवारी सायंकाळी हे पाणी सोडल्याचे त्यांनी सांगितले. सोडलेले पाणी सोमवारी रात्री १० वाजतापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मंगळवारी पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर शहरात पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. म्हणजे नागरिकांना आणखी एक दिवस पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.
तीन दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा नसल्याने नागरिकांना वापरासाठी पाणी मिळत नाही. पिण्यालाही पाणी शिल्लक नसल्याने शहरातील पाणी विक्रीचा धंदा जोमाने वाढला आहे. जर जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईची ही परीस्थिती आहे, तर एप्रिल व मे महिन्यात नागरिकांना कोठून पाणी मिळणार, याची चिंता वणीकरांना लागली आहे.

धरणात पाणी कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजनेनुसार शहरात पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु नदी कोरडी पडल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.
तारेंद्र बोर्डे,
नगराध्यक्ष, न.प.वणी

Web Title: Worn in water for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.