जिल्ह्यातील वकिलांचे लेखणीबंद आंदोलन
By admin | Published: October 30, 2014 10:57 PM2014-10-30T22:57:54+5:302014-10-30T22:57:54+5:30
वकिलाविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील वकिलांनी गुरुवारी लेखणीबंद आंदोलन केले. यामुळे जिल्ह्यातील न्यायालयांचे कामकाज प्रभावित झाले होते.
एसपींना निवेदन : गुन्हा मागे घेण्याची मागणी
यवतमाळ : वकिलाविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील वकिलांनी गुरुवारी लेखणीबंद आंदोलन केले. यामुळे जिल्ह्यातील न्यायालयांचे कामकाज प्रभावित झाले होते. जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
नेर तालुका बार असोसिएशनचे सदस्य अॅड. लतिफ आर.मिर्झा पांढरकवडा येथे न्यायालयात प्रकरण चालविण्यासाठी गेले होते. त्यावेळी न्यायालय परिसरात लोकांनी जमाव करून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्याविरुद्ध एका महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हा बार असोसिएशनने गुरुवारी एक दिवसीय लेखणीबंद आंदोलन पुकारले होते. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश चव्हाण, अॅड. सलीम शाह, अॅड. मिनाजोद्दीन मलनस, अॅड. साहील पठाण, अॅड. इम्रान देशमुख, अॅड. सय्यद अली, अॅड. मुन्ना ठाकरे, अॅड. एम.व्ही. भगत यांच्यासह अनेक विधिज्ञ उपस्थित होते. तसेच बाभूळगाव येथेही वकिलांनी काम बंद आंदोलन केले.
या आंदोलनात अॅड. जी.व्ही.कडुकार, अॅड. रणजित रंगारी, अॅड. सतीश ठाकरे, अॅड. हजारे, अॅड. पोलादे, अॅड. रोशनी वानोडे, अॅड. सतीश गावंडे, अॅड. वानखडे, अॅड.एस.आर. गुल्हाने आदी सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)