रोजगारासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:18 PM2019-02-21T22:18:25+5:302019-02-21T22:20:58+5:30
ग्रामीण भागातील महिलांपुढे आजही रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. रोजगार नसल्याने उपजीविकेत अडचणी येतात. तालुक्यातील ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील महिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून कामे सुरू करण्यात यावी यासाठी आंदोलन केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : ग्रामीण भागातील महिलांपुढे आजही रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. रोजगार नसल्याने उपजीविकेत अडचणी येतात. तालुक्यातील ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील महिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून कामे सुरू करण्यात यावी यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाला ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून पाठबळ दिले. अखेर प्रशासनाला महिलांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. मनरेगातील कामे आता सुरू झाली आहेत.
ब्राह्मणवाडा येथील महिलांनी मनरेगाचे जॉब कार्ड घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. रोजगार नसल्याने या महिलांची काय स्थिती आहे याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. महिलांचे आंदोलन आणि ‘लोकमत’च्या वृत्तामुळे पंचायत समिती प्रशासन ताळ्यावर आले. गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांनी तत्काळ मनरेगातील कामाचा आढावा घेतला. त्यानंतर ही कामे सुरू करण्यात आली. महिलांचे आंदोलन यशस्वी झाल्याने त्यांनी आपला जल्लोष थेट मनरेगाच्या कामावरच साजरा केला.
या आंदोलनात शशीकला कांबळे, मंगला बनकर, चंद्रकला सोनवणे, मंदा राऊत, दीशा शेंडे, कविता बागडे, कांता राऊत, सुनीता भिसे, कविता बागडे, वच्छला सहारे, सुशीला दुरटकर, वनिता खोब्रागडे, चंद्रकला पुराम, अंबादास गजबे, गणेश सोनवणे, संदीप राऊत, नारायण मरसकोल्हे, तुषार दुरटकर यांनी आंदोलनात पुढाकार घेतला होता. तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने शेतीची कामे उपलब्ध नाहीत.