‘यशदा’ने दिले नवनिर्वाचित सरपंचांना क्षमता बांधणी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:42 AM2021-09-19T04:42:54+5:302021-09-19T04:42:54+5:30
यात तालुक्यातील नवीन सरपंचांचे प्रशिक्षण पार पडले. उद्घाटनाला उपविभागीय अधिकारी सावन कुमार, डॉ. राम पोले, प्राचार्य अश्विन आडे, देवीदास ...
यात तालुक्यातील नवीन सरपंचांचे प्रशिक्षण पार पडले. उद्घाटनाला उपविभागीय अधिकारी सावन कुमार, डॉ. राम पोले, प्राचार्य अश्विन आडे, देवीदास ढगे उपस्थित होते. सरपंचांना सभा कमकाज, मासिक सभा, ग्रामसभा, वेळेचे व्यवस्थापन, पंचायत पंचांग, सरपंचपदाचे आर्थिक दायित्व, लेखा संहिता २०११ व सामाजिक लेखापरीक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, लोकसहभागातून ग्रामविकास, ग्रामपंचायत अधिनियम ठळक तरतुदी, अधिकार, कर्तव्य व जबाबदारी आदींबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
आमचा गाव आमचा विकास, १५ वा वित्त आयोग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, खरेदी प्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन, सुप्रशासनासाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर, कोरोनामुक्त गावच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, उत्पन्नाच्या बाबी, अंदाजपत्रक व ग्रामपंचायत दप्तर नमुना १ ते ३३ यावर चर्चा, संवाद कौशल्य, मानव विकास निर्देशांक आणि मानवी विकासात आपला जिल्हा, लोकसभा आदर्श संकल्पना, ग्रुप सादरीकरण या विषयाची माहिती देण्यात आली. यशदाच्यावतीने डॉ. राम पोले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडदे, गटविकास अधिकारी प्रवीण वानखडे, सभापती छाया हगवणे, प्राचार्य अश्विन आडे, देवीदास ढगे, लीना तुरकर, अर्चना जतकर, रामदास पाटमासे, सुदाम पवार, सुभाष पवार, प्रा. अर्चना हरिमकर, डॉ. सारिका नाईक, प्रा. कैलास राऊत, वंदना ढवळे, अमोल मिरासे, पंजाबराव चव्हाण, डॉ. भालचंद्र देशमुख, सुभाष बोडखे, प्रभाकर धावडे, तुळशीराम चव्हाण, अमोल डाखोरे, सुभाष शर्मा, वर्षा निकम, विवेक गोगटे, शरद वानखडे आदींनी मार्गदर्शन केले.