कचऱ्याने यवतमाळकरांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 09:46 PM2018-09-09T21:46:41+5:302018-09-09T21:47:22+5:30

शहराच्या चौफेर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कधीकाळी स्वच्छ शहर ही असलेली प्रतिमा आता यवतमाळने केव्हाच गमावली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने अघोषित डम्पिंग यार्ड तयार झाले.

Yashmalkar's health hazard by the trash | कचऱ्याने यवतमाळकरांचे आरोग्य धोक्यात

कचऱ्याने यवतमाळकरांचे आरोग्य धोक्यात

Next
ठळक मुद्देविलगीकरण नावालाच : सीईओंच्या बंगल्यासमोर कचऱ्याचे ढीग, पोलीस लाईनच्या विहिरीत कचरा प्रक्रिया

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहराच्या चौफेर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कधीकाळी स्वच्छ शहर ही असलेली प्रतिमा आता यवतमाळने केव्हाच गमावली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने अघोषित डम्पिंग यार्ड तयार झाले. यातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरील परिसर, पोलीस लाईनमधील विहिरीही सुटल्या नाही. एकूणच या कचऱ्याने यवतमाळ नगरपरिषदेतील तमाम पदाधिकारी व प्रशासनाच्या जागरूकता व कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. आधीच यवतमाळ शहर जणू शंभर टक्के खड्डेयुक्त झाले आहे. त्यात आता कचऱ्यामुळे अस्वच्छतेची भर पडल्याने नागरिकांचा श्वास गुदमरतो आहे. शहराची ही झालेली अवस्था लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या राजकारण्यांसाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी ठरली आहे. मात्र प्रत्यक्षात या लोकप्रतिनिधींना फारसे सोयरसूतक नसल्याचे त्यांच्या एकूणच चुप्पीवरून दिसून येते. अर्थात, काही लोकप्रतिनिधी याला अपवाद असले तरी त्यांची संख्या अगदीच नगण्य असल्याने त्यांच्या आंदोलनाचा प्रशासनावर काहीएक फरक जाणवत नाही. सावरगडला गांडुळ प्रकल्प आणि धामणगाव रोडवर डम्पिंग यार्ड असले तरी तेथे कोणतीही प्रक्रिया होताना दिसत नाही. त्यामुळे हे प्रकल्प नावालाच उरले आहे. ठिकठिकाणचे कचऱ्याचे हे ढिगारे जणू मिनी अनधिकृत डम्पिंग यार्ड बनले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नगरपरिषदेने कचरा विलगीकरणासाठी अभिनव पध्दत शोधून काढली आहे. वसाहतीतील प्रमुख चौक, रस्त्यावर कचºयाचे ढिग टाकले जातात. यात ओला- सुका असा सर्वच प्रकारचा कचरा टाकला जातो. या ढिगावर मोकाट वराह स्वछंदपणे आपले खाद्य शोधून ओला कचरा जागेवरच नष्ट करतात, परिसरात पसरवतात. त्यानंतर पालिकेचे कर्मचारी उरलेला कचरा भरून गावाबाहेर नेऊन टाकतात. या पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. तर पालिकेच्या वाढीव क्षेत्रात अपवादानेच कचरा संकलन होत आहे. नागरिकांना घरासमोरच कचरा जाळून नष्ट करावा लागतो. त्यामुळे हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरुद्ध असंतोष आहे.


कचरा विलगीकरणासाठी पालिकेचे वराह पालन
स्वच्छतेची बोंबाबोंब, कचऱ्यावर कागदोपत्रीच प्रक्रिया
घंटागाडीत वेगळा केलेला कचरा एकाच ट्रॅक्टरमध्ये
शिळे अन्न उघड्यावरच
वाढीव क्षेत्रात कधीतरी फिरतो ट्रॅक्टर
घरासमोेर जाळूनच नष्ट केला जातो कचरा
सेंद्रीय खत र्नििर्मती कुंड दुर्लक्षित
हॉटेल, मंगलकार्यालयातील ‘वेस्ट’ रस्त्यावर
बँक चौकातील पोच रस्ता बनला डंपिंग यार्ड

Web Title: Yashmalkar's health hazard by the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.