यवतमाळच्या १२०० मुलींना बनविणार कराटेपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 09:42 PM2018-10-04T21:42:21+5:302018-10-04T21:44:19+5:30

शहरात गुन्हेगारी घटना वाढत असल्याने सुज्ञ नागरिक दडपणाखाली वावरत आहेत. विशेषत: महिला आणि मुलींच्या मनाचा कोंडमारा होत आहे. या बंदिस्त आणि भयग्रस्त वातावरणात मुलींना आत्मबळ मिळावे, स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी नगरपालिकेने स्तुत्य पाऊल उचलले आहे.

Yatmal's 1200 girls will make karateapuri | यवतमाळच्या १२०० मुलींना बनविणार कराटेपटू

यवतमाळच्या १२०० मुलींना बनविणार कराटेपटू

Next
ठळक मुद्देनगरपालिकेचे स्तुत्य पाऊल : वाढत्या गुन्हेगारीमुळे मुलींना आत्मसंरक्षणासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात गुन्हेगारी घटना वाढत असल्याने सुज्ञ नागरिक दडपणाखाली वावरत आहेत. विशेषत: महिला आणि मुलींच्या मनाचा कोंडमारा होत आहे. या बंदिस्त आणि भयग्रस्त वातावरणात मुलींना आत्मबळ मिळावे, स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी नगरपालिकेने स्तुत्य पाऊल उचलले आहे. सुमारे १२०० मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण देऊन ‘मजबूत’ केले जाणार आहे.
या उपक्रमासाठी नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या शाळेत गोरगरिबांच्या मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष जगण्याचे धडे दिले जाणार आहे. समाजात वावरताना स्वत:चे संरक्षण कसे करावे, हे शिकविले जाणार आहे. गुरुवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष कांचन चौधरी, महिला व बालकल्याण सभापती नंदा जिरापुरे, शिक्षण सभापती नीता केळापुरे, प्रशासन अधिकारी योगेश डाफ आदी उपस्थित होते. शहरातील नगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये शेवटच्या एका तासात कराटे शिकविले जाणार आहे. त्यासाठी नगरपालिकेने कराटेपटू संघटनेशी करार केला आहे. हे प्रशिक्षण रोज एक तास या प्रमाणे पुढील तीन महिने नियमित सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणा दरम्यान उत्तम कराटेपटू म्हणून पुढे येणाऱ्या विद्यार्थिनींना कराटेचे आणखी अद्ययावत प्रशिक्षण दिले जाणार आहे. भीतीचे वातावरण वाढत असताना कराटे प्रशिक्षणातून मुली धीट बनणार आहे.

Web Title: Yatmal's 1200 girls will make karateapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.