यवतमाळात कीर्तन महोत्सव

By Admin | Published: December 25, 2015 03:17 AM2015-12-25T03:17:22+5:302015-12-25T03:17:22+5:30

गेल्या दहा वर्षांची परंपरा जपत यवतमाळ शहरात यावर्षीही कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Yavatam kirtan festival | यवतमाळात कीर्तन महोत्सव

यवतमाळात कीर्तन महोत्सव

googlenewsNext

यवतमाळ : गेल्या दहा वर्षांची परंपरा जपत यवतमाळ शहरात यावर्षीही कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येत्या ४ जानेवारीपासून १२ जानेवारीपर्यंत येथील अवधूत व्यायामशाळेच्या प्रांगणात हा महोत्सव होणार आहे.
आयोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत. कीर्तन महोत्सवाचा उद्घाटन सोहळा ४ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता अवधूतवाडी येथील व्यायामशाळेत होणार आहे. यावेळी कीर्तन महोत्सवाचे अध्यक्ष महंत श्रीश्री रामलखनदास महाराज, अंबिका माता बोपापूर उपस्थित राहणार आहे.
कीर्तन महोत्सवात ४ जानेवारीपासून दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९.३० वाजतापर्यंत नामवंतांचे कीर्तन होणार आहे. त्यामध्ये ४ जानेवारीला विलास गरवारे सातारा, ५ जानेवारीला श्रीनिवास कानिटकर औरंगाबाद, ६ रोजी हभप युगंधरा वीरकर पुणे, ७ रोजी हभप संज्योत केतकर पुणे, ८ रोजी हभप प्रज्ञाताई रामदासी बीड, ९ रोजी हभप अवंतिका तोळे पुणे, १० व ११ रोजी हभप रामनाथ अय्यर मुंबई, १२ जानेवारीला हभप शरद घाग नृसिंहवाडी यांचे कीर्तन होणार आहे.
कीर्तनादरम्यान संवादिनीवर गंगाधर देव व तबल्यावर पद्मनाम देव नांदेड साथसंगत करणार आहे. कीर्तन महोत्सवाच्या समाप्तीनंतर प्रसाद वितरण होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कैपिल्येवार, सचिव अरुण भिसे, डॉ.विजय पोटे, अरविंद तायडे, डॉ.सुशील बत्तलवार, वसंत बेडेकर यांनी दिली.
कीर्तन महोत्सवाच्या आयोजनासाठी विनोद देशपांडे, ओंकार गोरे, राजेश्वर निवल, दिगंबरपंत गंगमवार, विनाशक कशाळकर, रजनी कंचलवार, आदित्य देशपांडे, विनय नायगावकर, रवी ढगे, प्रशांत गोडे, गजेश तोंडरे आदी परिश्रम घेत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Yavatam kirtan festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.