यवतमाळ नगर परिषदेच्या घंटागाड्या फसल्या चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 09:46 PM2019-07-01T21:46:26+5:302019-07-01T21:46:42+5:30

नगरपरिषद आरोग्य विभागात सातत्याने संकटाची मालिका सुरू आहे. ऐन पावसाळ््यात शहरातील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा कोलमडण्याच मार्गावर आहे. कंत्राटदाराच्या संपानंतर आता शहरातील घंटागाड्याचे चाक चिखलात फसले आहे.

Yavatmal City Council's Ghantagadi, | यवतमाळ नगर परिषदेच्या घंटागाड्या फसल्या चिखलात

यवतमाळ नगर परिषदेच्या घंटागाड्या फसल्या चिखलात

Next
ठळक मुद्देउपाययोजनेची बोंब : धामणगाव बायपासवर टाकला जातोय कचरा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषद आरोग्य विभागात सातत्याने संकटाची मालिका सुरू आहे. ऐन पावसाळ््यात शहरातील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा कोलमडण्याच मार्गावर आहे. कंत्राटदाराच्या संपानंतर आता शहरातील घंटागाड्याचे चाक चिखलात फसले आहे. धामणगाव मार्गावर पालिकेने अनधिकृत कचरा डेपो थाटला आहे. तेथे पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने शहरातील कचरा घेऊन गेलेल्या घंटागाड्या सोमवारी सकाळी येथे अडकून पडल्या. त्यामुळे अनेक गाड्या रस्त्याच्या कडेलाच रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
शहरातून गोळा होणारा कचरा हा विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. याबाबत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कठोर नियम केले आहेत. या एकाही नियमाची अंमलबजावणी होत नाही. पालिकेचा हक्काचा असलेला सावरगड येथील कचरा डेपो बंद आहे. येथे कचरा टाकण्यास सावरगड ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. हे प्रकरण अनेक दिवसांपासून सुरू असूनही पालिका प्रशासनाने कचरा डेपोसाठी पर्यायी जागेची व्यवस्था केली नाही. जागा घेण्याबाबतची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया होणे शक्य नाही. उघड्या जागेवर कचरा फेकून देत शहर स्वच्छतेचा टेंभा नगरपरिषद मिरवत आहे. यामुळे शहरालगतचे बायपास कचरा डेपो बनले आहे. पालिकेने धामणगाव बायपासवर तात्पुरत्या स्वरूपात कचरा ‘डम्प’ करण्यासाठी भाडेतत्वावर जागा घेतली आहे. येथे कचरा टाकण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. घनकचरा प्रक्रिया नियमांची कोणती अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे भविष्यात भयंकर परिणाम शहरवासीयांना भोगावे लागण्याचा धोका आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारमुळेच काळाच्या पडद्याआड गेलेली कॉलराची साथ पुन्हा जिवंत झाली आहे. याने शहरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष सुरू आहे. सोमवारी सकाळी एकाच वेळी अनेक घंटागाड्या चिखलात फसल्यामुळे धामणगाव बायपास परिसरात रांगा लागल्या होत्या. ऐन पावसात पुन्हा शहरातील कचरा संकलन कोलमडण्याच्या स्थितीत आहे.

पावसाळ्यात साथरोगाची भीती
धामणगाव बायपासवर ज्या ठिकाणी कचरा ‘डम्प’ केला जातो, त्याला लागूनच तलावफैल परिसरतील पंचशिलनगरची वस्ती आहे. शिवाय हा कचरा एका नाल्यात टाकला जात आहे. यामुळे परिसरातील जलस्त्रोत दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसातच या भागात कचºयाचे कृत्रिम पर्वत तयार झाले आहे. हिच स्थिती राहिल्यास लगतच्या परिसरात साथरोगाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. याचे टक्केवारीत मस्त असलेल्या प्रशासनाला काहीच सोयरसुतक नाही.

Web Title: Yavatmal City Council's Ghantagadi,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.