यवतमाळ शहरात गुंडांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 09:58 PM2018-02-15T21:58:32+5:302018-02-15T21:59:06+5:30

पाठोपाठ घडणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यांमुळे यवतमाळ शहर गुंडांच्या हवाली झाले की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातूनच नागरिकांमध्ये गुंडांची दहशत निर्माण झाली आहे.

Yavatmal city terrorists bullying | यवतमाळ शहरात गुंडांची दहशत

यवतमाळ शहरात गुंडांची दहशत

Next
ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्था ऐरणीवर : जिल्ह्यात दीड महिन्यांत नऊ खून, गुन्हेगारी टोळ््यांना राजकीय आश्रय

राजेश निस्ताने ।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : पाठोपाठ घडणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यांमुळे यवतमाळ शहर गुंडांच्या हवाली झाले की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातूनच नागरिकांमध्ये गुंडांची दहशत निर्माण झाली आहे. गुंडांच्या कारवाया आणि पोलिसांची बघ्याची भूमिका यामुळे कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे.
यवतमाळ शहर संघटित गुन्हेगारीसाठी ओळखले जाते. लहान-मोठ्या टोळ्या, त्यातून होणाऱ्या वर्चस्वाच्या लढाया, खून, मारामाºया, घातक शस्त्रांचे साठे, अवैध सावकारी, व्याजाची वसुली, बाजारपेठेतील खंडणी वसुली, घरे-दुकाने खाली करण्यासाठी निर्माण केली जाणारी दहशत अशा कारवाया या टोळ्यांकडून चालविल्या जातात. त्यातच आता विरोधी टोळीचे संपलेले आव्हान, खुला राजकीय आशीर्वाद, प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे या गुन्हेगारी टोळ्यांची हिंमत चांगलीच वाढली आहे. एकेकाळी एका विशिष्ट क्षेत्रापर्यंतच मर्यादित असलेल्या या गुन्हेगारी टोळ्यांनी आता संपूर्ण यवतमाळ शहर कवेत घेतले आहे. हे शहर जणू गुन्हेगारी टोळ्यांच्या सावटात असल्याच्या प्रतिक्रिया चौकाचौकातून ऐकायला मिळत आहेत. या टोळ्यांना कुणाचाच अटकाव राहिलेला नाही.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची, नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच लगाम घातला जात नसल्याने गुंडांचा धुमाकूळ वाढला आहे. यवतमाळ शहरात तलवार, चाकू या शस्त्रांचा वापर जणू नित्याचा झाला आहे. अनेकदा त्यात अग्निशस्त्रांचाही वापर होतो. त्यातूनच रक्तपात घडतो.
१५ दिवसांत नऊ खून
सन २०१८ मध्ये गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात आतापर्यंत खुनाच्या नऊ घटना घडल्या आहेत. जानेवारीमध्ये पाच तर फेब्रुवारीमध्ये १५ दिवसातच चार खून झाले आहे. २०१७ मध्ये १२ महिन्यांत खुनाच्या ५४ घटनांची नोंद आहे. या खुनांमागे वरवर कारणे वेगळी दिसत असली तरी त्यातील अनेक घटनांचे मूळ मात्र गुन्हेगारीतच दडले आहे.
ट्रिपल सीट वाहनांचा धुमाकूळ
गुन्हेगारी टोळ्यांचे सदस्य शहरभर प्रचंड ध्वनी प्रदूषण करणारी दुचाकी वाहने घेऊन फिरतात. त्यावर ट्रिपल सिट असतात. या वाहनांना क्रमांकाचा पत्ता नसतो. त्याऐवजी विशिष्ट ‘सिम्बॉल’ लिहून आपल्या गुन्हेगारी टोळीची ओळख सांगण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्हा वाहतूक शाखा प्रमुखांनी यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था व पार्किंगला बऱ्यापैकी शिस्त लावली आहे. त्याबाबत जनतेतून समाधानही व्यक्त होत आहे. आता शहरातून कर्णकर्कश हॉर्न वाजवत सुसाट धावणाºया या ट्रिपल सिट वाहनांना नियंत्रित करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. शहरात ट्रिपल सीट आणि विना क्रमांकाची फिरणारी वाहने वाहतूक पोलिसांची भीती संपल्याचे संकेत देत आहेत.
कोचिंग क्लासेस बाहेर टवाळखोरांची गर्दी
अशीच स्थिती कोचिंग क्लासेस परिसरातही पहायला मिळते. नेमके शिकवणी वर्ग सुटण्याच्या वेळीच टवाळखोरांची बाहेर गर्दी असते. चार-दोन अपवाद वगळता बहुतांश कोचिंग क्लासेस संचालकांकडून या गंभीरबाबीकडे लक्ष दिले जात नाही. आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नाही, अनेक ठिकाणी सिक्युरीटी गार्ड, सीसीटीव्ही कॅमेरे याचाही पत्ता नाही. अशा कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालकही असतात ‘सज्ज’
गुन्हेगारी टोळीचे सदस्य व टवाळखोर युवकांचा वावर पाहता पालक वर्गही कायम चिंतेत असतो. अनेकदा पालक स्वत: मुलांना नेणे-आणणे करतात. तर गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व असलेल्या भागात शाळा-महाविद्यालये असतील तर अनेक पालक ‘आर-पार’ करण्यासाठी स्वत:ही ‘पुरेशा तयारी’ने सज्ज असतात, अशी माहिती आहे.
कायदा हाती घेतला जाण्याची भीती
यातूनच एखादवेळी मोठा भडका उडण्याची, भविष्यात महिला-विद्यार्थिनी-पालक स्वत:च कायदा हातात घेण्याची व छेडखानी करणाºयांचा ‘अक्कू यादव’ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुंडांना धडा शिकविणार कोण?
अनेक पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या पायाशी आहेत आणि या सत्ताधाऱ्यांचे गुंडांना खुले अभय आहे. त्यामुळे कायदेशीर व पारदर्शकपणे धडक कारवाई करण्याची हिंमत पोलिसात दिसत नाही. नेमक्या याच कारणावरुन यवतमाळ शहरात प्रचंड गुन्हेगारी वाढली असून दरआठवड्यातच कुणाचा ना कुणाचा मुडदा पडतो आहे. प्रशासनाची बोटचेपी भूमिका, राजकीय आश्रय यामुळेच गुंडांचे फावते आहे. त्यातूनच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला-विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न
शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी या संस्थांपुढे तसेच लगतच्या चौकांमध्ये टवाळखोर युवकांची गर्दी पाहायला मिळते. त्यात बहुतांश गुन्हेगारी टोळ्यांचेच ट्रिपल सीट सदस्य असतात. विद्यार्थिनीच नव्हे तर अनेकदा शिक्षिका, महिलांंनाही या टोळ्यांच्या छेडखानीचा सामना करावा लागतो.
पोलीस अधिकारी नेत्यांच्या दारात
‘वाढता राजकीय हस्तक्षेप’ हे कारण पोलिसांकडून गुन्हेगारीसाठी पुढे केले जाते. त्यात बरेच वास्तवही आहे. मात्र पोलिसांची राजकीय नेत्यांशी असलेली जवळीक, उठबससुध्दा तेवढीच कारणीभूत ठरते. अनेक पोलीस अधिकारी वरकमाईच्या पोस्टींगसाठी नेत्यांचे पाय धरतात. त्यामुळे पुढे आयुष्यभर सदर अधिकाऱ्याला त्या नेत्यापुढे मान वर करण्याची सोय राहत नाही.

Web Title: Yavatmal city terrorists bullying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा