यवतमाळच्या नगरसेवकांनी हातात घेतला झाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 10:19 PM2019-09-01T22:19:47+5:302019-09-01T22:21:33+5:30

नगरपरिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. तर नगराध्यक्ष पद हे शिवसेनेकडे आहे. राजकीय कुरघोडीत नगरपालिका प्रशासनाची पकड सैल झाली आहे. यामुळे शहरातील दैनंदिन कामकाजही होत नाही. साफसफाईची तर मोठी समस्या आहे. नगरसेवकांनी वारंवार आंदोलन करूनही प्रशासनाकडून दखल घेतल्या जात नाही.

Yavatmal councilors took the broom in their hands | यवतमाळच्या नगरसेवकांनी हातात घेतला झाडू

यवतमाळच्या नगरसेवकांनी हातात घेतला झाडू

Next
ठळक मुद्देपालिका प्रशासनाचा सर्वपक्षीय निषेध : इंदिरा गांधी मार्केटमधील रस्त्याची साफसफाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात नगरपरिषद प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दैनंदिन घनकचऱ्याच्या सफाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. याचा निषेध म्हणून सर्वपक्षीय नगरसेवकांनी रविवारी सकाळी इंदिरा गांधी मार्केट परिसराची स्वच्छता केली. अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.
नगरपरिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. तर नगराध्यक्ष पद हे शिवसेनेकडे आहे. राजकीय कुरघोडीत नगरपालिका प्रशासनाची पकड सैल झाली आहे. यामुळे शहरातील दैनंदिन कामकाजही होत नाही. साफसफाईची तर मोठी समस्या आहे. नगरसेवकांनी वारंवार आंदोलन करूनही प्रशासनाकडून दखल घेतल्या जात नाही. गुळमिळीत उत्तरे देऊन वेळ मारुन नेली जाते. याचाच निषेध म्हणून नगरसेवकांनी हातात झाडू घेत सफाई करून प्रतिकात्मक आंदोलन केले. यामध्ये काँग्रेसचे गटनेते चंद्रशेखर चौधरी, वैशाली सवाई, विशाल पावडे, दर्शना इंगोले, पल्लवी रामटेके, भाजपचे गटनेते विजय खडसे, अमोल देशमुख, मनीष दुबे, संगीता कासार, दिनेश चिंडाले, शुभांगी हातगावकर, पुष्पा राऊत, नंदा जिरापुरे, विभा कुलकर्णी, ताई कनाके, रिता धावतोडे, करुणा तेलंग, कोमल ताजने, चंद्रभागा मडावी, संगीता राऊत, राष्ट्रवादीच्या सपना लंगोटे, शिवसेनेचे गटनेते गजानन इंगोले, बसपाचे गणेश धवने, सुषमा राऊत आदींनी सहभाग घेतला. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी शशीकुमार नंदा यांनीसुद्धा नगरसेवकांसोबत हातात झाडू घेऊन साफसफाई केली. पाचकंदील चौक ते इंदिरा गांधी मार्केट परिसर नगरसेवकांनी साफ केला. नगरसेवकांच्या या गांधीगिरीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र या आंदोलनानंतर पालिकेचे प्रशासन सुधारणार का असा प्रश्न नगर पालिका वर्तुळातच उपस्थित केला जात आहे.

Web Title: Yavatmal councilors took the broom in their hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.